महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेत्याच्या अडचणीमध्ये वाढ, साहिल खान पोलिस कोठडीत, म्हणाला..
बाॅलिवूड अभिनेता साहिल खान याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेत्याचे पाय खोलात असल्याचे बघायला मिळतंय. कोर्टाकडूनही साहिल खान याला दिलासा मिळाला नाहीये. गेल्या काही दिवसांपासून सतत लोकेशन बदलताना साहिल खान हा दिसला.
बाॅलिवूड अभिनेता साहिल खान याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. महादेव बेटिंग ॲप प्रकरण अभिनेत्याच्या चांगलेच अंगलट आल्याचे बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता फरार होता. पोलिस सतत साहिल खान याच्या मागावर होते. शेवटी पोलिसांच्या हाती साहिल खान हा लागला. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात फक्त साहिल खान हाच नाही तर अजूनही अनेक बाॅलिवूड कलाकारांची नावे आलीत. या प्रकरणी अनेकांची चाैकशी देखील झालीये. आता या प्रकरणातील अत्यंत मोठे अपडेट हे पुढे येताना दिसत आहे. साहिल खान याच्या अडचणीत वाढ झालीये.
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात साहिल खान याचे पाय खोलात असल्याचे देखील बघायला मिळत आहे. आता कोर्टाने 1 मे पर्यंत साहिल खान याला पोलिस कोठडी सुनावली आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरण अभिनेत्याच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसतंय. आता या चाैकशीत काही मोठे खुलासे हे साहिल खान याच्याकडून केले जाऊ शकतात.
कोर्टाने साहिल खानला पोलिस कोठडी सुनावली आहे. हेच नाही तर यावेळी साहिल खान हा म्हणाला की, माझा मुंबई पोलिस आणि कायद्यावर पूर्ण विश्वास आहे, सत्य लवकरच पुढे येईल. मात्र, साहिल खान याला अटक झाल्याने बाॅलिवूडमध्ये मोठी खळबळ बघायला मिळत आहे. यानंतर कोणावर कारवाई होणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
मुंबई पोलिसांनी साहिल खान याला छत्तीसगडमधून अटक केलीये. अभिनेता सतत त्याचे लोकेशन हे बदलताना दिसला. मुंबई उच्च न्यायालयाने साहिल खान याची अटकपूर्व याचिका फेटाळली होती. अटकपूर्व याचिका फेटाळल्यापासून अभिनेत्याने मुंबईमधून पळ काढला होता आणि तो कधी गोवा, कर्नाटक तर कधी हैद्राबाद येथे राहत होता.
शेवटी पोलिसांनी आज साहिल खान याला अटक केली. रिपोर्टनुसार ‘द लोटस बुक ॲप’ नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये साहिल खान हा पार्टनर होता. या ॲपचा तो प्रचारही करत होता. हे ॲप महादेव बेटिंग ॲपशीही जोडलेले आहे. साहिल खान हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो, साहिल खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.