Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : अभिनेता सलमान खानचं अपार्टमेंट 95 हजार रुपये महिना भाड्याने, स्वत: राहतो एका 1BHK मध्ये!

सलमान स्वत: आपल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येच राहतो. मिळालेल्या माहितीनुसार सलमानने आपल्या अपार्टमेंटं अॅग्रिमेंट 6 डिसेंबर रोजी केलं आहे. हे अॅग्रिमेंट 33 महिन्यासाठी करण्यात आलं आहे. सलमान खानच्या भाडेकरुने 738 स्क्वेअर फुटाच्या या प्रॉपर्टीसाठी 2.85 लाख रुपये डिपॉझिट दिलं आहे.

Salman Khan : अभिनेता सलमान खानचं अपार्टमेंट 95 हजार रुपये महिना भाड्याने, स्वत: राहतो एका 1BHK मध्ये!
सलमान खान
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 11:05 PM

मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) दबंग अशी ओळख असलेल्या सलमान खानने (Salman Khan) आपलं एक अपार्टमेंट भाड्याने दिलं आहे. या अपार्टमेंटचं त्याला 95 हजार रुपये महिना भाडं मिळतं. सलमान खानची ही प्रॉपर्टी वांद्रे पश्चिम (Bandra West) भागात शिव अस्खान हाइट्समध्ये 14 व्या मजल्यावर आहे. सलमान स्वत: आपल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येच राहतो. मिळालेल्या माहितीनुसार सलमानने आपल्या अपार्टमेंटं अॅग्रिमेंट 6 डिसेंबर रोजी केलं आहे. हे अॅग्रिमेंट 33 महिन्यासाठी करण्यात आलं आहे. सलमान खानच्या भाडेकरुने 738 स्क्वेअर फुटाच्या या प्रॉपर्टीसाठी 2.85 लाख रुपये डिपॉझिट दिलं आहे.

दोन महिन्यांपूर्वी स्वत: किरायाने घेतलं अपार्टमेंट

सलमान खानकडे मुंबईत काही प्रॉपर्टी आहेत. यापूर्वी सलमान खान व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने वांद्रे इथं मकबा हाइट्सच्या 17 आणि 18 व्या मजल्यासाठी आपलं अॅग्रिमेंट रिन्यू केलं आहे. या ड्यूप्लेक्सचे मालक बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दिकी आहेत. हा करार 11 महिन्यांसाठी आहे. ही प्रॉपर्टी तब्बल 2 हजार 265 वर्ग फूट इतकी आहे. सलमान या ड्यूप्लेक्ससाठी महिना साडे आठ लाख रुपये महिना किराया देतो.

कपिल शर्माच्या शो मध्ये सांगितलं 1BHK मध्ये राहतो

अंतिम चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कपिल शर्माने सलमान खानला विचारलं होतं की रियल लाईफमध्ये तुम्ही 1BHK मध्ये राहता. तुम्ही खरंच स्वत: पैसे खर्च करत नाही का? त्याला उत्तर देताना सलमान खान म्हणाला की, कधी-कधी केवळ त्याच वस्तूंवर खर्च होतो, ज्यावर तुम्ही खर्च करु इच्छिता. मात्र, आजकाल खर्च खूप कमी झाला आहे. सलमान खानचे हे उत्तर ऐकून सर्वजण हसले. म्हणजे सलमान म्हणाला होता की त्याला जास्त पैसे खर्च करायला आवडत नाही.

बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला!

सलमान खान याने 29 नोव्हेंबर रोजी महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी सलमानने चक्क बापूंचा चरखाही चालवला. लाडक्या ‘भाईजान’चा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यावेळी सलमानने हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. आश्रमाला भेट देऊन निघताना सलमानने व्हिजिटर बुकमध्ये आपला अभिप्राय लिहिला. त्याने लिहिले की, ‘मला इथे यायला खूप आवडले आणि हा आनंद मी कधीच विसरणार नाही. मला पहिल्यांदाच अशा ठिकाणी फिरायला मिळाले आहे. मला या आश्रमात पुन्हा यायला आवडेल.’

इतर बातम्या :

UP Election : उत्तर प्रदेशात काका-पुतण्या पुन्हा एकत्र, अखिलेश आणि शिवपाल यादव 5 वर्षानंतर एकत्र निवडणूक लढवणार

Goa Assembly Election : काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी?

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.