Shreyas Talpade याची भन्नाट ‘लव्हस्टोरी…’, पण अभिनेत्याने का लपवलं स्वतःच्या लग्नाचं सत्य?
Shreyas Talpade | मालिका, सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या श्रेयस तळपदे याची भन्नाट 'लव्हस्टोरी...', पहिली भेट ते लग्नापर्यंतचा अनोखा प्रवास... सध्या सर्वत्र श्रेयस तळपदे याच्या प्रेम कहाणीची चर्चा...
मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : झगमगत्या विश्वातील एक कायम चर्चेत राहणारी गोष्ट म्हणजे सेलिब्रिटींचे प्रेम प्रकरणं... सेलिब्रिटी कायम त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दल बोलताना दिसतात, त्यांचं कौतुक करताना दिसतात. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर देखील आयुष्यातील खास व्यक्तीवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. अभिनेता श्रेयस तळपदे देखील पत्नीसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. श्रेयस याच्या पत्नीचं नाव दिप्ती असं आहे. श्रेयस आणि दिप्ती यांची लव्हस्टोरी देखील भन्नाट आहे. अभिनेत्याच्या अभिनयाप्रमाणेच त्याची लव्हस्टोरी देखील प्रचंड खास आहे.
श्रेयस आणि दिप्ती यांची पहिली भेट दिप्ती हिच्या कॉलेजमध्ये झाली होती. कॉलेजच्या एका फेस्टमध्ये श्रेयसला बोलावण्यात आलं होतं. तेव्हा कॅलेजच्या सेक्रेटरीला म्हणजे दिप्तीला पाहून, पहिल्या नजरेतच श्रेयस दिप्तीच्या प्रेमात पडला. पहिल्या भेटीनंतर चार दिवसांनंतर श्रेयसने दिप्तीला प्रपोज केलं.
२००० साली जेव्हा अभिनेत्याला कॉलेजच्या एका फेस्टमध्ये बोलावण्यात आलं होतं, तेव्हा दिप्ती कॉलेजची सेक्रेटरी होती. फेस्टमध्ये श्रेयसने दिप्तीला पाहिलं आणि दोघे पहिल्या नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले. पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दिप्ती आणि श्रेयस यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण काही काळ अभिनेत्याला स्वतःचं लग्न लपवाववं लागलं.
View this post on Instagram
२००४ मध्ये श्रेयस आणि दिप्तीने लग्न केलं. शुटिंगमधून एक दिवसाची सुट्टी घेतल्यानंतर अभिनेत्याने त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, करियरच्या सुरुवातीलाच अभिनेत्याने लग्न केलं. श्रेयसने ‘इकबाल’ सिनेमातून करियरची सुरुवात केली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केलं.
सिनेमाची शुटिंग सुरु होण्याआधी श्रेयसने लग्नासाठी सुट्टी मागितली. तेव्हा दिग्दर्शकांनी सुट्टी रद्द केली. पण तेव्हापर्यंत लग्नाची पत्रिका वाटून झाल्या होत्या. लग्नाची पूर्ण तयारी देखील झाली होती. अशात दिग्दर्शकांनी विचार केला की, श्रेयस सिनेमात डेब्यू करत आहे आणि अशात लग्न केल्यास सिनेमावर आणि श्रेयसच्या करियरवर वाईट परिणाम होतील.
पण श्रेयसने दिग्दर्शकांना सांगितलं की, मी लग्नाबद्दल कोणालाही सांगणार नाही. तेव्हा लग्नासाठी अभिनेत्याला एका दिवसाची सुट्टी मिळाली आणि श्रेयस आणि दिप्तीचं लग्न झालं. श्रेयसने लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले. लग्नाच्या १४ वर्षांनंतर ४ मे २०१८ साली श्रेयस आणि दिप्ती सरोगेसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले.
श्रेयस कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर देखील अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.