सोनू सूदच्या ‘त्या’ ट्विटवर संतापले नेटकरी! सोशल मीडियावर ट्रेंड केला #WhoTheHellAreUSonuSood
सोनू सूदच्या मदतीचेही खूप कौतुक झाले, पण महाशिवरात्रीच्या दिवशी अचानक सोनू सूद सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आणि ट्विटरवर #WhoTheHellAreUSonuSood वर ट्रेंड होण्यास सुरुवात झाली.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी पुढे येतो आणि म्हणूनच तो नेहमी चर्चेत असतो. सोनू सूदच्या मदतीचेही खूप कौतुक झाले, पण महाशिवरात्रीच्या दिवशी अचानक सोनू सूद सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आणि ट्विटरवर #WhoTheHellAreUSonuSood वर ट्रेंड होण्यास सुरुवात झाली. खरं तर, सोनू सूद महाशिवरात्रीनिमित्ताने केलेल्या ट्विटमुळे शिवभक्त संतप्त झाले आहेत आणि त्याला अनेक तिखट बोल ऐकवत आहेत (Actor Sonu Sood gets trolled on social media after mahshivratri tweet).
काय आहे सोनू सूदचं ट्विट?
शिव भगवान की फोटो फॉरवर्ड करके नहीं किसी की मदद करके महाशिवरात्रि मनाएं। ओम नमः शिवाय ।
— sonu sood (@SonuSood) March 11, 2021
अभिनेता सोनू सूद याने महाशिवरात्रीनिमित्ताने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘महाशिवरात्र महादेवाचे फोटो फॉरवर्ड न करता, एखाद्याची मदत करून साजरी करा. ओम नमः शिवाय.’ सोनूच्या याच ट्विटवर लोक संतप्त झाले आहेत आणि #WhoTheHellAreUSonuSood हा हॅशटॅग वापरून त्याला खूप सुनवत आहेत.
पाहा लोक काय म्हणतायत?
एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘कृपया हिंदु धर्माबद्दल आम्हाला फुकटचे ज्ञान वाटू नका. खरोखर ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे.’
Plz don’t distribute free gyaan on Hindu religion ? it’s really really really shameful. I don’t aspects .#WhoTheHellAreUSonuSood pic.twitter.com/jEXaImO1aD
— Alka Thakur❤️ (@Alkathakuren) March 11, 2021
ईदच्या निमित्ताने सोनू सूदने केलेले काही जुने ट्विट स्क्रीनशॉट घेऊन काही यूजर्स त्याला ट्रोल देखील करत आहेत. यावर एका वापरकर्त्याने लिहिले, ‘व्वा दुटप्पीपणा! कुठून आणतोस हे ज्ञान… तेही फक्त हिंदू सणांवर. माझा धर्म माझी मर्जी’
Waah Hypocrisy ?? Kha se laate ho ye gyan…Wo bhi sirf Hindu festivals par
My festival My Choice. – RT Like & Share this ?#WhoTheHellAreUSonuSood pic.twitter.com/GpDLiYb97q
— Vedic Bharat | वैदिक भारत (@vaidicbharat) March 11, 2021
एका वापरकर्त्याने लिहिले, ‘लॉकडाऊन दरम्यान सोनूने लोकांना मदत केली ही चांगली गोष्ट आहे, परंतु यामुळे त्यांना हिंदूंपेक्षा वर जाण्याचा आणि उत्सव कसा साजरा करावा, हे सांगण्याचा अधिकार मिळत नाही.’
It’s good that he did great in helping vulnerable people during the period of lockdown but that doesn’t give him authority to show his superiority complex over Hindus & start teaching them how to celebrate their festival. Just look at his hypocrisy below? #WhoTheHellAreUSonuSood pic.twitter.com/Gy5UcdEhJR
— S I D V I D – 19™ (@Only_Sid_Matter) March 11, 2021
(Actor Sonu Sood gets trolled on social media after mahshivratri tweet)
काही लोकांनी केले सोनूचे समर्थन
#WhoTheHellAreUSonuSood He’s the guy who came on roads to help thousands of migrants when their elected Government abandoned the poor souls to die during the unprecedented lockdowns.
Don’t know about acting skills as I do not watch movies, but @SonuSood is an honest Indian Idol. pic.twitter.com/l5WokAtrtC
— ?????? (@aka_dpu) March 11, 2021
#WhoTheHellAreUSonuSood Answer in one line: He is the real hero of 2020; his selfless work for migrants amid pandemic and lockdown sets a rare example…#ThankYouSonuSood pic.twitter.com/XKQGPNZyKY
— ??AʙʜɪsʜᴇK?? (@ThissisAbhi) March 11, 2021
असे नाही की, सर्व लोक सोनू सूदला विरोध करत आहेत. सोनू सूदच्या समर्थनार्थही एक मोठा वर्ग ट्विट करत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘हाच तोच मनुष्य आहे, जो आपण निवडलेल्या सरकारने लॉकडाऊन दरम्यान गरिबांना मरण्यासाठी सोडले असता, रस्त्यावर हजारो स्थलांतरितांना मदत करण्यासाठी आला होता. मी चित्रपट पाहत नसलो, मला त्याच्या अभिनयाच्या कौशल्यांबद्दल माहिती नसले तरी पण सोनू सूद खरोखरच एक प्रामाणिक भारतीय व्यक्तिमत्व आहे.’
सोनूची माणुसकी!
कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान, सोनू सूदने गरीब परप्रांतीय कामगारांना घरीच सोडण्याचीच नव्हे, तर त्यांच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था केली होती. या कामासाठी सोनू सूदची केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रशंसा झाली. यानंतर, चाहत्यांच्या एका मोठ्या वर्गाने सोनू सूदला ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली होती. तर, काहींनी सोनू सूद यांची मंदिरेही बांधली होती. लॉकडाऊननंतरही सोनू सूद गरिबांच्या मदतीसाठी नेहमीच चर्चेत असतो.
(Actor Sonu Sood gets trolled on social media after mahshivratri tweet)
हेही वाचा :
KRK vs SRK | कमाल खानचा किंग खानशी मोठा पंगा, सोशल मीडियावर लीक केली ‘पठाण’ची कथा!