Sushant Singh Rajput suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

 Sushant Singh Rajput suicide मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवलं.

Sushant Singh Rajput suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jun 14, 2020 | 5:12 PM

Sushant Singh Rajput suicide मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवलं. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण सध्या अस्पष्ट आहे. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्या केल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ( Sushant Singh Rajput suicide) अवघ्या काही काही दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजरने आत्महत्या केली होती.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नेमका का केली? त्याला नेमकं कोणत्या गोष्टीची चिंता होती? त्याला नैराश्य आलं होतं का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने विचारले जात आहेत. सुशांतने मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने बॉलिवूड हादरुन गेलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुशांतने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. फोटोतही त्याच्या गळावरील व्रण दिसत आहेत. त्याच्या आसपासच्या लोकांची , मित्रांची पोलिसांनी चौकशी केली, प्राथमिक चौकशीत तणावाखाली येऊन त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. मानसिक तणाव हे कारण समोर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट अद्याप पोलिसांना सापडलेली नाही.

आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेले अनेक दिवस सुशांत हा डिप्रेशनमध्ये होता. त्याची मैत्रिण रिया आणि तो नीवन फ्लॅट शोधत होते. त्याला नवीन फ्लॅट हवा होता. त्यानंतर तो या वांद्र्याच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता, अशीही माहिती समोर आली आहे.

सुशात सिंह राजपूतने आतापर्यंत अनेक टीव्ही सिरिअल आणि चित्रपटात काम केले आहे. सुशांतच्या करिअरची सुरुवात टीव्ही सिरिअल ‘किस देश मे हा मेरा दिल’ मधून झाली. यानंतर त्याला खरी लोकप्रियता दिग्दर्शक एकता कपूर यांची सिरिअल ‘पवित्र रिश्ता’मधून मिळाली. यानंतर सुशांतने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.

टीव्ही सिरिअल ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते.

‘काय पो छे’ या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने प्रमूख भूमिका निभावली. या चित्रपटातील त्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केलं होतं.  त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटात वाणी कपूर आणि परिणीती चोप्राोसबत त्याने काम केलं . यानंतर ‘केदारनाथ’, ‘पीके’ सारख्या सुपरहिट चित्रपटातही त्याने काम केलं.

सुशात सिंह राजपूतने आतापर्यंत टीव्ही सिरिअल आणि चित्रपटात काम केले आहे. सुशांतच्या करिअरची सुरुवात टीव्ही सिरिअल किस देश मे हा मेरा दिल मधून झाली आहे. यानंतर खरी ओळख त्याला दिग्दर्शक एकता कपूर यांची सिरिअल पवित्र रिश्तामधून मिळाली. यानंतर सुशांतने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.

काय पो छे या चित्रपटातू सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने प्रमूख भूमिका निभावली होती. त्यासोबत त्याच्या अभिनयाचेही सर्वांनी कौतुक केले होते. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स चित्रपटात वाणी कपूर आणि परिणीती चोप्राोसबत त्याने काम केले होते. यानंतर केदारनाथ, पीके सारख्या हिट चित्रपटातही त्याने काम केले आहे.  सुशांत सिंहचा जन्म बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील महीदा येथे झाला.

त्याने Kai Po Che! या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. भारतीय क्रिकेटपटू आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील सुशांतची भूमिका फार गाजली. 2016 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपट सुशांत सिंहने धोनीची भूमिका केली होती. तर धोनीच्या बायकोची भूमिका अभिनेत्री कियारा अडवाणी हिने रंगवली आहे. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हिंदीसोबतच तामिळ, तेलुगू आणि मराठीमध्येही हा चित्रपट प्रदर्शित झाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.