अभिनेता ते नेता : चित्रपटाच्या सेटवर नव्हे तर आता संसदेत एकत्र दिसणार हे दोन कलाकार

लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचं अधिवेशन सुरु आहे. लोकसभेत खासदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर ते आता संसदेचे सदस्य झाले आहेत. त्यातच दोन कलाकार ज्यांनी चित्रपटात एकत्र काम केले होते ते आता संसदेत देखील सहकारी झाले आहेत.

अभिनेता ते नेता : चित्रपटाच्या सेटवर नव्हे तर आता संसदेत एकत्र दिसणार हे दोन कलाकार
Follow us
| Updated on: Jun 26, 2024 | 7:25 PM

केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी यापूर्वी एका चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केले आहे. ते आज संसदेत एकत्र जाताना दिसले. दोन्ही तरुण नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 2011 मध्ये दोघांनी मिले ना मिले हम या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट इतका चालला नव्हता. या क्षेत्रात यश न मिळाल्याने चिराग पासवान यांनी त्यांचे वडील दिवंगत रामविलास पासवान यांच्या सावलीत राजकारणात पाऊल ठेवले. दुसरीकडे कंगनाने अनेक हिट चित्रपट दिलेत. आता ती खासदार म्हणून संसदेत पोहोचली आहे.

चिराग पासवान यांचा प्रवास

चित्रपटानंतर आता दोघे पुन्हा एकदा एकमेकांचे सहकारी आहेत. आता चित्रपटाच्या सेटवर नव्हे तर संसदेत एकत्र दिसणार आहेत. चिराग पासवान यांनी वडिलांच्या निधनानंतर स्वता:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. त्यांच्या नेतृत्वात त्यांचे पक्षाचे पाच खासदार निवडून आले आहेत.

चिराग पासवान आता LJP चे नेतृत्व करत आहेत. जे एनडीएचा एक भाग आहेत. या निवडणुकीत लढलेल्या पाचही जागा त्यांनी जिंकून दाखवल्या. चिराग पासवान हे आता कॅबिनेट मंत्री देखील आहेत. बिहारमधील जमुई येथून दोन वेळा खासदार राहिलेले चिराग पासवान आता राज्याच्या हाजीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

कंगना राणौत पहिल्यांदाच खासदार

दुसरीकडे कंगना राणौत पहिल्यांदाच खासदार झाली आहे. ती हिमाचल प्रदेशातील मंडी येथून निवडून आली आहे. अभिनेत्री म्हणून तिने बॉलिवूडमध्ये ठसा उमटवला आहे. आता ती राजकारणी म्हणून संसदेत पोहोचली आहे. कंगनाने मंडी लोकसभा मतदारसंघातून विक्रमादित्य सिंग यांचा जवळपास 75,000 मतांच्या फरकाने पराभव केला. राष्ट्रीय पुरस्कार विजेता कंगना आता तिच्या इमर्जन्सी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. जो 6 सप्टेंबर रोजी पडद्यावर येणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.