Kriti Sanon | अभिनेत्याने क्रिती सनॉनला म्हटलं ‘पनौती’; 600 कोटी रुपये बुडवणार असल्याची केली टीका

क्रिती सनॉन आणि कार्तिक आर्यन यांचा 'शहजादा' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. पहिल्या दोन दिवसांत 'शहजादा'ने फक्त 12 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यावरूनच केआरकेनं क्रितीवर निशाणा साधला आहे.

Kriti Sanon | अभिनेत्याने क्रिती सनॉनला म्हटलं 'पनौती'; 600 कोटी रुपये बुडवणार असल्याची केली टीका
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 10:52 AM

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्री आणि सेलिब्रिटींबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या कमाल आर खानने पुन्हा एकदा असं वक्तव्य केलंय, ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. यावेळी त्याने अभिनेत्री क्रिती सनॉनवर निशाणा साधला आहे. केआरकेनं कृतीला ‘पनौती’ असं म्हटलंय. हे वाचून चाहते केआरकेवर चांगलेच भडकले आहेत. क्रिती सनॉन आणि कार्तिक आर्यन यांचा ‘शहजादा’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. पहिल्या दोन दिवसांत ‘शहजादा’ने फक्त 12 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यावरूनच केआरकेनं क्रितीवर निशाणा साधला आहे.

केआरकेनं क्रितीला ‘पनौती’ म्हटलंय. ती ज्या चित्रपटात काम करते, तो चित्रपट फ्लॉप होतो, अशी टीका त्याने केली आहे. मात्र त्याच्या या टीकेनंतर नेटकरी केआरकेवरच राग व्यक्त करत आहेत.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाला केआरके?

‘क्रिती सनॉन ही बॉलिवूडमधल्या पनौती अभिनेत्रींपैकी एक आहे. ज्या चित्रपटात काम करते, तो फ्लॉप ठरतो. भेडियासारख्या चित्रपटालाही तिने खाऊन टाकलं होतं’, असं त्याने एका ट्विटमध्ये म्हटलंय. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने लिहिलं, ‘आता तर महापनौती क्रिती सनॉनचा जलवा अजून बाकी आहे. 600 कोटींच्या बजेटचा चित्रपट आदिपुरुषची हिरोईनसुद्धा तीच आहे. क्रिती सनॉन की जय हो!’

केआरकेच्या या ट्विट्सवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘असं बोलताना लाज वाटली पाहिजे तुला’, असं एकाने लिहिलंय. तर ‘तेलुगू चित्रपटाची कॉपी केल्यानंतर कसा काय चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालेल? रिमेक करताना काहीतरी नवीनसुद्धा त्यात हवं. तुम्ही लोक उगाचंच तिची बदनामी करताय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘भावा तिच्या भूमिका मग तूच कर’, असंही नेटकऱ्यांनी केआरकेला सुनावलंय.

अशा पद्धतीने टिप्पणी करण्याची केआरकेची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांवर निशाणा साधला होता. इतकंच नव्हे तर अभिनेता सलमान खानने त्याच्याविरोधात तक्रारसुद्धा केली होती.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.