Vishal: सेटवर अभिनेता विशालच्या पायाला दुखापत; शूटिंगचं पुढील शेड्युल रद्द

'लठ्ठी' याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विशालला दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे. या चित्रपटात तो पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून त्याचे बरेच ॲक्शन सीन्स आहेत. सेटवरील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vishal: सेटवर अभिनेता विशालच्या पायाला दुखापत; शूटिंगचं पुढील शेड्युल रद्द
actor Vishal Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 11:17 AM

तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विशालच्या (Vishal) पायाला शूटिंगदरम्यान दुखापत झाली. ‘लठ्ठी’ (Laththi) या आगामी तमिळ चित्रपटातील ॲक्शन सीन्सचं शूटिंग करताना त्याच्या पायाला दुखापत (injury) झाली. चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनचं शूटिंग सुरू होतं. मात्र आता विशालच्या दुखापतीमुळे पुढील शूटिंग थांबवण्यात आली आहे. ‘लठ्ठी’ याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विशालला दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे. या चित्रपटात तो पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून त्याचे बरेच ॲक्शन सीन्स आहेत. सेटवरील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये विशाल जमिनीवर पाय पकडून बसलेला दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला चित्रपटाची टीम त्याची काळजी घेताना पहायला मिळत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते स्टंट कोरिओग्राफर पीटर हेन हे या चित्रपटातील क्लायमॅक्स ॲक्शन सीक्वेन्सचं परीक्षण करत आहेत. फेब्रुवारीमध्ये लठ्ठीच्या ॲक्शन सीनचं शूटिंग करताना विशालला त्याच्या हातावर आणि बोटावर अनेक हेअरलाइन फ्रॅक्चर झाले होते. त्यातून बरं व्हायला त्याला एक महिना लागला आणि त्यादरम्यान त्याने शूटिंगमधून ब्रेक घेतला. त्यानंतर मार्च महिन्यात तो शूटिंगला परतला.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

‘मी परत आलोय. केरळमध्ये काही आठवडे आराम केल्यानंतर मी शूटिंगला परतलोय. आता चित्रपटाच्या फायनल शेड्युलसाठी शूटिंग करायला मी सज्ज आहे’, असं त्याने ट्विट केलं होतं. रमण आणि नंदा यांच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे निर्मित लठ्ठीचं दिग्दर्शन ए विनोद कुमार यांनी केलं आहे. यात सॅम सीएस संगीत दिग्दर्शक आहेत तर एम बालसुब्रमण्यम सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळत आहेत.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.