सोनाक्षी सिन्हा हिला पळून नेऊन करायचे होते लग्न, ‘या’ अभिनेत्याचा अत्यंत मोठा खुलासा, म्हणाला…

| Updated on: Jul 23, 2024 | 12:15 PM

सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा हिने काही दिवसांपूर्वीच झहीर इक्बालसोबत लग्न केले. विशेष म्हणजे या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

सोनाक्षी सिन्हा हिला पळून नेऊन करायचे होते लग्न, या अभिनेत्याचा अत्यंत मोठा खुलासा, म्हणाला...
Sonakshi Sinha
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाने मोठा काळ बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत 23 जून रोजी लग्न केले. तब्बल सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आपल्याच लग्नात धमाल करताना सोनाक्षी सिन्हा दिसली.

सोनाक्षी सिन्हा ही लग्न झाल्यानंतर दोनदा हनिमूनला गेली. ज्याचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले. नुकताच आता सोनाक्षी सिन्हा हिचा पती आणि अभिनेता झहीर इक्बाल याने एक मुलाखत दिलीये, यावेळी सोनाक्षीही उपस्थित होती. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना झहीर इक्बाल हा दिसला. त्याने सोनाक्षीसोबतच्या लग्नाबद्दलही खुलासा केलाय.

झहीर इक्बाल म्हणाला की, मला नेहमीच पळून जाऊन लग्न करण्याची इच्छा होती. म्हणजे मला दुसऱ्या देशात जाऊन पळून लग्न करायचे होते आणि परत भारतात यायचे होते. परंतू, मला त्यानंतर समजले की, भारतामध्ये अशाप्रकारचे लग्न कायद्यानुसार मान्य नाहीये. आम्ही बाहेर जाऊन लग्न करू शकणार नव्हतो. त्यानंतर सोनाक्षीने लग्नाबद्दलचे तिचे प्लॅनिंग सांगितले.

सोनाक्षी सिन्हा हिला नेहमीच जवळच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न करण्याची इच्छा होती. झहीरचे प्लॅनिंग रद्द झाल्यानंतर सोनाक्षीने तिचे सर्व नियोजन लग्नाबद्दलचे सांगितले. विशेष म्हणजे सोनाक्षीचे ऐकून मी देखील खुश झाल्याचे सांगताना झहीर दिसला. सोनाक्षी सिन्हा पुढे म्हणाली की, माझी आणि झहीरची एक इच्छा होती की, आमच्या जवळचे सर्व लोक लग्नात उपस्थित असावीत.

झहीर म्हणाला की, त्यामुळे आम्ही लग्नाच्यानंतर एका मोठ्या पार्टीचे आयोजनही केले. सुरूवातीला सांगितले जात होते की, सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा यांचा विरोध आहे. दुसरीकडे लग्नाच्या वेळी सोनाक्षी हिच्या बाजूला आई वडील उभे दिसले. सोनाक्षी सिन्हाचे दोन्ही भाऊ लव आणि कुश या लग्नासाठी उपस्थित नव्हते.