घटस्फोटाच्या चर्चांमध्येच ऐश्वर्या राय थेट पोहोचली जलसा बंगल्यावर, ‘ते’ फोटो पुढे, मुलगी आराध्या बच्चनही…
अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्या रायने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलीये. ऐश्वर्या आणि अभिषेकबद्दल विविध चर्चा सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू आहे. हेच नाही तर यांच्यातील वाद इतका जास्त वाढलाय की, हे दोघे घटस्फोट घेणार आहेत. मध्यंतरी काही रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला, ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले असून ती मुलगी आराध्या हिच्यासोबत तिच्या आईच्या घरी शिफ्ट झालीये. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातही ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत पोहोचली होती. दुसरीकडे बच्चन कुटुंबिय एकत्र आले. हे पाहूनच परत एकदा घटस्फोटाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली.
अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्षा हा बंगला श्वेता बच्चन हिच्या नावावर केला आणि तीच गोष्ट ऐश्वर्या राय हिला अजिबात आवडली नसल्याचे सांगितले जाते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही जलसा बंगल्यात राहत नाहीये. आता नुकताच ऐश्वर्या राय ही जलसा बंगल्याबाहेर स्पॉट झालीये. ऐश्वर्या ही मुलगी आराध्या हिच्यासोबत दिसली.
ऐश्वर्या राय आणि आराध्या एकत्र जलवा बंगल्यात जाताना दिसल्या. ऐश्वर्या राय तिच्या कारमधून जलसा बंगला येथे पोहोचली. यावेळी ती हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. मोकळे केस आणि सनग्लासेसमध्ये जबरदस्त ऐश्वर्या दिसत होती. आराध्याने पांढरा टी शर्टसोबत काळी पँट घातली. बऱ्याच दिवसानंतर आराध्या जलसा बंगल्यावर पोहोचली.
ऐश्वर्या ही मुलगी आराध्या हिच्यासोबत परत एकदा जलसा बंगल्यावर राहण्यास आल्याची चर्चा आहे. खरोखरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद मिटला का? हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय ही विदेशात जाताना दिसली. यावेळी अभिषेक बच्चन ऐश्वर्या हिच्यासोबत दिसला नाही.
सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा असताना त्यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये लग्न केले. लग्न करण्याच्या अगोदर दोघेही एकमेकांना डेट करताना दिसले. अभिषेक बच्चन याच्या अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खानला डेट करत होती.