आलिया भट्ट हिचा नको त्या अवस्थेत व्हिडीओ व्हायरल; अभिनेत्री ‘डीपफेक’च्या जाळ्यात

Alia Bhatt : रश्मिका, कतरिना, काजोल... यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींनंतर आलिया भट्ट देखील 'डीपफेक' व्हिडीओच्या जाळ्यात... आलिया हिचा नको त्या अवस्थेतील व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया भट्ट हिच्या फेक व्हिडीओची चर्चा...

आलिया भट्ट हिचा नको त्या अवस्थेत व्हिडीओ व्हायरल; अभिनेत्री 'डीपफेक'च्या जाळ्यात
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 8:58 AM

मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूड अभिनेत्रींवर सध्या ‘डीपफेक’ व्हिडीओचं संकट आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना, काजोल, कतरिना कैफ… यांसारख्या अनेक अभिनेत्रींनंतर आलिया भट्ट देखील ‘डीपफेक’च्या जाळ्यात अडकली आहे. आलिया हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. व्हिडीओमध्ये एका मुलीच्या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट् हिच्या चेहऱ्याचा वापर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये आलिया भट्ट हिला नको त्या अवस्थेत दाखवण्यात आलं आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार, व्हिटीओ एडिट केल्याचं सांगण्यात येत आहे..

काही दिवसांपूर्वी रश्मिका हिचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यावर अनेक सेलिब्रिटींनी संताप देखील व्यक्त केला. एवढंच नाही तर, दिल्ली पोलिसांच्या हाती याप्रकरणी पुरावे सापडले असल्याची माहिती देखील समोर येत आहे. शिवाय गुन्हेगारांना अटक होईल अशी माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली होती.

दरम्यान, पोलीस डीपफेक प्रकरणी कारवाई करत असले, तर अभिनेत्री ‘डीपफेक’च्या जाळ्यात अडकत आहेत. रश्मिका हिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील दोषींवर कडक कारवाई करा… असं सांगितलं होतं. ‘डीपफेक’ प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असताना आलिया हिचा देखील फेक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया आणि तिच्या फेक व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

आलिया हिचे सिनेमे..

गेल्या वर्षी लेकीला जन्म दिल्यानंतर अभिनेत्री ‘हार्ट ऑफ स्टोन’ आणि ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर आली. ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. एवढंच नाही तर, अभिनेत्री लवकरच ‘जिगरा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

आलिया कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. मुलीच्या जन्मानंतर आलिया कायम लेकीबद्दल बोलताना दिसते. आलिया हिने नुकताच राहा हिचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. पण अभिनेत्रीने अद्याप लेकीचा चेहता चाहत्यांना दाखलेला नाही. आलिया आणि रणबीर कपूर यांनी राहा हिच्यासाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याच्या देखील चर्चा रंगलेल्या असतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.