आईसोबत ‘या’ शुल्लक गोष्टीवर उडाले खटके, अभिनेत्रीने आपलं जीवनचं संपवलं

'या' शुल्लक गोष्टीवरुन आई सोबत वाद, अभिनेत्रीने दुसऱ्याच दिवशी उचललं टोकाचं पाऊल.. आकांक्षाच्या निधनानंतर आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे.

आईसोबत 'या' शुल्लक गोष्टीवर उडाले खटके, अभिनेत्रीने आपलं जीवनचं संपवलं
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 3:43 PM

मुंबई : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. आकांक्षाच्या निधनानंतर आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. आकांक्षानंतर आणखी एका अभिनेत्रीने टोकाचं पाऊल उचललं आहे. अभिनेत्री आणि गायक रुचिस्मिता गुरु हिने स्वतःचं जीवन संपवलं आहे. अभिनेत्रीच्या निधानानंतर कुटुंब आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुचिस्मिता गुरु हिने अनेक एल्बममध्ये अभिनय आणि गायनाची जबाबदारी पार पाडली आहे. एवढंच नाही तर, तिने अनेक स्टेज शो देखील केले आहेत. रुचिस्मिता अभिनय क्षेत्रात सक्रिय होती. अभिनेत्रीने अचानक मोठा निर्णय घेतल्यामुळे सर्वांन मोठा धक्का बसला आहे.

रुचिस्मिता हिने २६ मार्च २०२३ रोजी अखेरचा श्वास घतेला. रुचिस्मिताच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीचं मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलं. रुचिस्मिता गुरू सोनपुरा जिल्ह्यातील बालंगीर शहरातील तळपाली येथे तिच्या मामाच्या घरी राहत होती. अभिनेत्रीचं संपूर्ण कुटुंबही तिच्यासोबत त्यांच्या मामाच्या घरी राहायचे.

रुचिस्मिता हिच्या आईने सांगितल्यानुसार, रात्री पराठा बनवण्यावरुन दोघींमध्ये काही खटके उडाले होते. ‘मी रुचिस्मिता हिला रात्री आठ वाजता बटाट्याचा पराठा बनवण्यासाठी सांगितलं होतं. पण ती मला म्हणाली रात्री १० वाजता बनवेल. याच गोष्टीमुळे आमच्या दोघींचं भांडण झालं.’ अशी माहिती रुचिस्मिताच्या आईने दिली आहे. (ruchismita guru news)

हे सुद्धा वाचा

रुचिस्मिता हिच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानूसार, अभिनेत्रीने याआधी देखील अनेकदा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. शुल्लक कारणावरून अभिनेत्रीने इतका मोठा निर्णय का घेतला? या गोष्टीचा तपास पोलीस करत आहेत. अशात अभिनेत्रीला पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर निधनाचं कारण समोर येईल.

रुचिस्मिता हिच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. रुचिस्मिता काही दिवस आधीच अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने स्वतःचं जीवन संपवलं. अभिनेत्रीच्या निधनानंतर आईने लेकीच्या बॉयफ्रेंडवर निशाणा साधला आहे. लेकीच्या निधनानंतर मधू दुबे मध्यांसोबत संवाद साधताना म्हणाल्या, ‘समर सिंह माझ्या मुलीला गेल्या तीन वर्षांपासून त्रास देत होता. त्याने आकांशाला २१ तारखेला धमकी दिली होती. तुली गायब करेल, संपवेल.. तू मला ओळखत नाही.. त्यानंतर २२ तारखेला माझी मुलगी बनारसमध्ये आली आणि त्याने माझ्या लेकीला संपवलं…’ सध्या आकांक्षाच्या निधनानंतर पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.