नवऱ्याला डोक्यातील उवा सारखं फेकून द्यायचं; अंकिता हिची खदखद
अंकिता लोखंडे नेहमीच चर्चेत असते. अंकिता लोखंडे हिने टीव्ही मालिकेसोबतच चित्रपटांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. अंकिता लोखंडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसतंय. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. बिग बॉस 17 मध्ये टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. मात्र, बिग बॉस 17 मध्ये यांच्यात वाद बघायला मिळतोय. आता तर अंकिता लोखंडे हिने पती विकी जैन याच्याबद्दल केलेले भाष्य ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. थेट अंकिता लोखंडे ही म्हणाली की, नवऱ्याला डोक्यातील उवा सारखे फेकून द्यायचे आहे. अंकिता लोखंडे हिचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.
अंकिता लोखंडे ही बिग बॉस 17 च्या घरात गार्डन परिसरात मुनव्वर फारुकी याच्यासोबत फिरताना दिसली. यावेळीच अंकिता थेट म्हणाली की, विकी किडा आहे किडा…तो खूप जास्त समावून सांगतो. बापरे माझे आणि त्याचे घरात भांडणे होऊ नये. मी अजिबातच विकी जैन याचा आवाज ऐकून शकत नाही. नवऱ्याला डोक्यातील उवा सारखे फेकून द्यायचे या अंकिता लोखंडे हिच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.
मुळात म्हणजे बिग बॉस 17 च्या घरात अंकिता आणि विकी यांच्यामध्ये मोठे वाद हे रंगताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे हिचे म्हणणे आहे की, विकी जैन हा बिग बॉस 17 च्या घरातील प्रत्येक सदस्याला वेळ देतो फक्त मला देत नाही. अंकिता लोखंडे हिचे वागणे देखील विकी जैन याला आवडताना दिसत नाहीये. भांडणानंतर नेहमीच अंकिता रडताना दिसते.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे खूप जास्त चांगले रिलेशन असल्याचे सांगितले जात होते. मात्र, बिग बॉस 17 मध्ये काहीतरी वेगळे चित्र हे बघायला मिळत आहे. सतत विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये वाद बघायला मिळतोय. विकी जैन याने देखील अंकिता लोखंडे हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये देखील मोठा वाद हा बघायला मिळतोय. अंकिता लोखंडे आणि मनारा यांच्यामध्ये नुकताच दिलेल्या राशन टास्कमध्ये देखील भांडत होताना दिसत आहेत. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून मनारा चोप्रा हिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.