अंकिता लोखंडे हिच्या प्रेग्नेंसी टेस्टचा आला रिपोर्ट, अभिनेत्री देणार थेट ‘बिग बॉस 17’मध्येच बाळाला जन्म? मोठा खुलासा
अंकिता लोखंडे हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. इतकेच नाही तर अंकिता लोखंडे हिने काही चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. अंकिता लोखंडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. अंकिता लोखंडे ही सध्या तूफान चर्चेत आहे.
मुंबई : बिग बॉस सीजन 17 मध्ये मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 मध्ये पुढील काही दिवसांमध्ये मोठे बदल हे बघायला मिळणार आहेत. बिग बॉस 17 च्या घरात असलेल्या अनेक सदस्यांना बाहेरचा रस्ता दाखवत थेट नवीन काही सदस्य हे घरात दाखल होण्यास तयार आहेत. बिग बॉस 17 ला अजूनही टीआरपीमध्ये काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. यामुळेच निर्माते हे सतत काही बदल करताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अंकिता लोखंडे ही प्रेग्नेंट असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. आता नुकताच अंकिता लोखंडे हिच्या प्रेग्नंसीचा रिपोर्ट आल्याचे कळतंय.
विकी जैन याला अंकिता लोखंडे म्हणताना दिसली होती की, मला काहीच बरेच वाटत नाहीये. मला काहीही खाण्याची इच्छा देखील होत नाही. मला फक्त घरी जायचे आहे. मला पिरियड्स पण आले नाहीत, मला माझ्या पोटात नेमके काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. इतकेच नाही तर अंकिता लोखंडे हिची बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी प्रेग्नंसी टेस्ट देखील केली होती.
आता याचाच रिपोर्ट आल्याचे कळतंय. रिपोर्टनुसार अंकिता लोखंडे ही प्रेग्नेंट नाहीये. प्रेग्नंसीचा रिपोर्ट अंकिता लोखंडे हिचा आला आहे. अंकिता लोखंडे ही प्रेग्नेंट असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसलीये. शेवटी खरी गोष्ट पुढे आलीये. सुरूवातीला अंकिता लोखंडे हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले होते.
Promo #BiggBoss17 WKW, #Orry in the house, #AnkitaLokhande aur #VickyJain ki maa ki narazgi, #Khanzadi hui evict?? pic.twitter.com/12jQdZCrG2
— The Khabri (@TheKhabriTweets) November 24, 2023
नुकताच विकी जैन याला फटकारताना सलमान खान हा दिसला आहे. इतकेच नाही तर सलमान खान याने घरातील सदस्यांसमोर विकी जैन याचा खरा चेहरा आणला आहे. आता अंकिता लोखंडे हिची आई आणि विकी जैन याचा आई दिसणार आहेत. या अंकिता लोखंडे आणि विकी यांना चांगलेच सुनावताना दिसणार आहेत.
इतकेच नाही तर विकी जैन याची आई थेट म्हणते की, तुम्ही घरात कधीच भांडणे करत नाही, मग इथे अशाप्रकारची भांडणे का करत आहात? यावेळी अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दोघेही ढसाढसा रडताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. अंकिता लोखंडे हिच्या प्रत्येक वाईट क्षणी तिच्यासोबत विकी जैन हा उभा राहिला. मात्र, बिग बाॅसच्या घरात यांच्यामध्ये जोरदार भांडणे ही बघायला मिळाली आहेत.