हेमा मालिनी यांनी कोणाचेही घर तोडले नाही, ‘या’ अभिनेत्रीचा मोठा खुलासा, थेट म्हणाली, लग्नाची..
बाॅलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. हेमा मालिनी यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचे पहिले लग्न झालेले असताना देखील त्यांच्यासोबत लग्न केले. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताना हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेंद्र यांनी लग्न केले.
अभिनेते धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताना अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले. या लग्नानंतर मोठी टीका ही हेमा मालिनी यांच्यावर झाली. आता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे. हेमा मालिनी यांच्यासोबतच्या लग्नानंतर धर्मेंद्र यांच्यावर मुलगा सनी देओल हा चांगलाच चिडला होता. हेच नाही तर अजूनही तो हेमा मालिनीला सनी बोलत नसल्याचे सांगितले जाते.
आता नुकताच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाबद्दल एका अभिनेत्रीने मोठा भाष्य केला आहे. अरूणा ईरानीने म्हटले की, हेमा मालिनीने धर्मेंद्रजी सोबत लग्न केले. पण त्यांचा विचार कधीच त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत वेगळा करण्याचा नव्हता किंवा कधीच त्यांनी तसे प्रयत्न केले नाहीत. लग्नाची काही गॅरंटी नसते. गॅरंटी असते ती फक्त आणि फक्त प्रेमाची.
जर तुमचे एकमेकांवरील प्रेम टिकून असेल तर लग्न टिकून असते. आपण म्हणून शक्यतो की ही माझी पत्नी आणि पती आहे. तुम्ही कुठेही बघा, जिथे प्रेम संपते तिथे लग्न तुटते. आता अरूणा ईरानी यांनी केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न हे प्रकाश कौर यांच्यासोबत झाले. मात्र, त्यांनी 1980 मध्ये प्रकाश कारै यांच्यासोबत घटस्फोट न घेता हेमा मालिनीसोबत लग्न केले.
काही दिवसांपूर्वीच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये आपल्या सावत्र आईबद्दल मोठा खुलासा करताना ईशा देओल ही दिसली. ईशा देओल हिने सांगितले की, आपल्या सावत्र आईला ती आयुष्यात फक्त एकदाच भेटली. सावत्र आईसोबत आपली पहिली भेट कशी ठरली, याबद्दल बोलताना ईशा देओल ही दिसली.
ईशा देओल म्हणाली की, माझ्या काकांची (धर्मेंद्र यांचे भाऊ) तब्येत खूप जास्त खराब होती. काहीही करून मला त्यांना भेटायला जायचे होते. मग मी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी प्रकाश काैर या तिथेच उपस्थित होत्या. मी त्यांच्या पाया पडले, विशेष म्हणजे त्यांनी मला आर्शिवाद देखील दिला. माझी आणि त्यांची ती पहिलीच भेट होती, असेही ईशा देओलने म्हटले.