घटस्फोटाच्या चर्चांमध्येच अभिनेत्री शेअर केला ‘हा’ फोटो, पतीसोबतच्या वादानंतर..

अभिनेत्री दलजीत कौर ही कायमच चर्चेत असते. दलजीत कौरची सोशल मीडियावर चांगली फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. हेच नाही तर कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दलजीत कौर ही दिसते. आता नुकताच अभिनेत्रीने एक फोटो शेअर केलाय.

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच अभिनेत्री शेअर केला 'हा' फोटो, पतीसोबतच्या वादानंतर..
Daljeet Kaur
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 6:35 PM

अभिनेत्री दलजीत कौर ही कायमच चर्चेत असते. दलजीत कौर हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केली. दलजीत कौर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. हेच नाही तर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही दलजीत कौर दिसते. दलजीत कौर ही दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली. दलजीत कौरचे पहिले लग्न शालिन भनोट याच्यासोबत झाले. दलजीत कौर आणि शालिनचा एक मुलगा देखील आहे. दलजीत कौरने दुसरे लग्न निखिल पटेल याच्यासोबत केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

निखिल पटेल याच्यासोबतच्या लग्नानंतर दलजीत कौर ही विदेशात शिफ्ट झाली होती. मात्र, लग्नाच्या अवघ्या काही दिवसांमध्ये दलजीत कौर ही भारतात परतली. यानंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या. फक्त हेच नाही तर दलजीत कौर हिने सोशल मीडियावरून लग्नाचे सर्व फोटोही डिलीट केले आणि नवऱ्याचे आडनाव देखील काढले.

दलजीत कौर हिच्या घटस्फोटाच्या तूफान चर्चा सुरू आहेत. यावर भाष्य करणे कायमच दलजीत कौर हिने टाळले आहे. आता नुकताच दलजीत कौर हिने एक फोटो शेअर केलाय. हा फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसल्याचे देखील बघायला मिळत आहे. या फोटोमध्ये दलजीत कौर हिने भांगेमध्ये कुंकू लावले आहे. हा फोटो शेअर करत तिने खास कॅप्शन देखील दिले आहे.

दलजीत कौर हिने ‘पढाकू मोड ऑन’ असे कॅप्शन देत फोटो शेअर केला. यावेळी दलजीत कौर हिच्या हातामध्ये पुस्तक दिसत आहे. या फोटोमुळे असा अंदाज लावला जातोय की, दलजीत कौर आणि निखिल पटेल यांच्यामधील वाद मिटला आहे. दलजीत कौरने सांगितले होते की, लग्नानंतर ती तिच्या नवीन कुटुंबासोबत विदेशातच राहणार आहे.

हेच नाही तर दलजीत कौर ही तिच्या मुलाला देखील घेऊन विदेशात गेली होती. गेल्या काही महिन्यापासून दलजीत कौर भारतातच आहे. आपल्या करिअरकडे लक्ष देणार असल्याचे सांगतानाही दलजीत कौर ही दिसली होती. दलजीत कौर ही बिग बाॅसच्या घरात देखील सहभागी झाली होती. यावेळी जबरदस्त गेम खेळताना दलजीत कौर ही दिसली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.