Drugs Case LIVE | दीपिकाची साडेपाच तास, तर सारा अली खानची साडेचार तास चौकशी

जवळपास साडेपाच तासाच्या चौकशीनंतर दीपिकाची आजची चौकशी संपली. दीपिका दुपारी चारच्या सुमारास NCB कार्यालयातून बाहेर पडली. (Deepika Padukone, Sara Ali Khan, Shraddha Kapoor Ncb Investigation Live Updates)

Drugs Case LIVE | दीपिकाची साडेपाच तास, तर सारा अली खानची साडेचार तास चौकशी
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 7:28 PM

मुंबई : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (Ncb Investigation In Drugs Case) चौकशी करत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha  Kapoor)  या तिघींची आज  (शनिवार 26 सप्टेंबर) चौकशी होत आहे.  याप्रकरणात आज NCB ने धर्मा प्रोडक्शनच्या क्षितीज प्रसादला अटक केली. 

दरम्यान जवळपास साडेपाच तासाच्या चौकशीनंतर दीपिकाची आजची चौकशी संपली. दीपिका दुपारी चारच्या सुमारास NCB कार्यालयातून बाहेर पडली. यानंतर संध्याकाळी 5.45 च्या सुमारास सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही चौकसी पूर्ण झाली. दोघीही NCB कार्यालयातून बाहेर पडल्या.

क्षितीज प्रसादला उद्या कोर्टात हजर करणार. आतापर्यंत 18 लोकांना अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची चौकशी केली. मात्र त्यांना अद्याप कुठलाही समन्स नाही. चौकशीत बऱ्याच गोष्टी उघड झाल्या. या चौकशीसाठी उद्या तिघीं पैकी कुणालाही बोलवलं नाही. समोरा-समोर केलेल्या चौकशीबाबत आम्ही मीडियाला माहिती देऊ शकत नाही, असं NCB अधिकारी एम अशोक जैन यांनी माध्यमांना सांगितलं.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या (Sushant Singh Case) तपासातून ड्रग्ज अँगलसमोर आला. हे ड्रग्ज कनेक्शन प्रकरण बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींपर्यंत (Bollywood Industry)  पोहोचलं आहे. दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha  Kapoor)  या तिघींची आज  (शनिवार 26 सप्टेंबर) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (Ncb Investigation In Drugs Case) चौकशी होत आहे. एनसीबीने दीपिकाला दिलेल्या चौकशीच्या वेळेआधीच 15 मिनिटं दीपिका एनसीबीच्या कार्यालयात सकाळी 10 च्या सुमारास दाखल झाली. त्याशिवाय दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशही एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली . (Actress Deepika Padukone,  Sara Ali Khan, Shraddha  Kapoor Ncb Investigation In Drugs Case Live Updates)

तर एनसीबीकडून सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला 10.30 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्या दोघींनीही एनसीबीकडे वेळ वाढवून मागितला होता. त्यानंतर जवळपास 11.48 सुमारास श्रद्धा कपूर एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली.

तसेच सारा अली खान हिने चर्चेला येण्यापूर्वी तिचे वडील अभिनेता सैफ अली खान यांच्याशी चर्चा केली. यावेळी कायदेशीर बाबींवर सल्ला ही घेण्यात आला. या चर्चेनंतर ती एनसीबी कार्यालयाकडे रवाना झाली. ती जवळपास दुपारी 1 वाजता एनसीबी कार्यालयात दाखल झाली.

?LIVE UPDATE?

[svt-event title=”अभिनेत्री सारा अली खानची चौकशी संपली” date=”26/09/2020,5:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दीपिका पदुकोणची आजची चौकशी संपली” date=”26/09/2020,4:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”धर्मा प्रोडक्शनच्या क्षीतिज प्रसादला अटक” date=”26/09/2020,2:49PM” class=”svt-cd-green” ] धर्मा प्रोडक्शनच्या क्षीतिज प्रसादला अटक, 24 तासांच्या चौकशीनंतर एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे, क्षीतिजच्या माहितीनुसार मुंबईतील चार ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. [/svt-event]

[svt-event title=”माल या शब्दाचा अर्थ ड्रग्ज नाही : दीपिका पादुकोण” date=”26/09/2020,2:41PM” class=”svt-cd-green” ] माल या शब्दाचा अर्थ ड्रग्ज नाही, अशी माहिती दीपिकाने एनसीबी अधिकाऱ्यांना दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”चित्रपटाच्या सेटवर सुशांत ड्रग्ज घ्यायचा : श्रद्धा कपूर” date=”26/09/2020,2:33PM” class=”svt-cd-green” ] चित्रपटाच्या सेटवर सुशांत ड्रग्ज घ्यायचा, श्रद्धा कपूरची एनसीबी अधिकाऱ्यांना माहिती [/svt-event]

[svt-event title=”अभिनेत्री श्रद्धा कपूरकडून ड्रग्ज सेवनाचा इन्कार” date=”26/09/2020,1:44PM” class=”svt-cd-green” ] अभिनेत्री श्रद्धा कपूरकडून ड्रग्ज सेवनाचा इन्कार, छिछोरेच्या पार्टीत सहभागी, मात्र ड्रग्ज घेतलं नाही, श्रद्धाची चौकशीदरम्यान माहिती [/svt-event]

[svt-event title=”ड्रग्ज संदर्भातील चॅट मी माझ्या मोबाईलमध्ये केलं होतं : दीपिका पादुकोण” date=”26/09/2020,1:18PM” class=”svt-cd-green” ] ड्रग्ज संदर्भातील चॅट मी माझ्या मोबाईलमध्ये केलं होतं, दीपिकाची एनसीबी अधिकाऱ्यांसमोर कबुली [/svt-event]

[svt-event title=”सारा अली खान एनसीबी कार्यालयात दाखल” date=”26/09/2020,1:01PM” class=”svt-cd-green” ] सारा अली खान एनसीबी कार्यालयात दाखल, थोड्याच वेळात एनसीबीकडून साराची चौकशी सुरु होणार [/svt-event]

[svt-event title=”दीपिकाच्या उत्तरावर एनसीबी असमाधानी, दीपिकाची एनसीबीच्या प्रश्नांना बगल : सूत्र” date=”26/09/2020,12:49PM” class=”svt-cd-green” ] दीपिकाच्या उत्तरावर एनसीबी असमाधानी, दीपिकाची एनसीबीच्या प्रश्नांना बगल, सूत्रांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”सारा अली खान एनसीबी कार्यालयाकडे रवाना” date=”26/09/2020,12:07PM” class=”svt-cd-green” ] सारा अली खान एनसीबी कार्यालयाकडे रवाना, थोड्याच वेळात सारा एनसीबी कार्यालयात पोहोचणार [/svt-event]

[svt-event title=”सारा आणि सैफ अली खानमध्ये चर्चा” date=”26/09/2020,12:03PM” class=”svt-cd-green” ] सारा आणि सैफ अली खानमध्ये चर्चा, कायदेशीर प्रक्रियेचा प्रयत्न सुरु, थोड्याच वेळात सारा अली खानही एनसीबी कार्यालयात दाखल होणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”अभिनेत्री श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात दाखल” date=”26/09/2020,11:48AM” class=”svt-cd-green” ] अभिनेत्री श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात दाखल, लवकरच श्रद्धाची चौकशी सुरु होणार [/svt-event]

[svt-event title=”दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश NCB कार्यालयात दाखल ” date=”26/09/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”NCB कडून चौकशीपूर्वी दीपिकाचा फोन ताब्यात” date=”26/09/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दीपिकाला एकूण 32 प्रश्न विचारणार” date=”26/09/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] दीपिकाला एकूण 32 प्रश्न विचारणार, दीपिकावर प्रश्नांचा भाडीमार, एनसीबी अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी [/svt-event]

[svt-event title=”तीन अधिकाऱ्यांकडून दीपिकाची चौकशी” date=”26/09/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ] तीन अधिकाऱ्यांकडून दीपिकाची चौकशी, यामध्ये एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश [/svt-event]

[svt-event title=”सारा अली खानच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त” date=”26/09/2020,10:20AM” class=”svt-cd-green” ] सारा अली खानच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, साराचीही आज एनसीबीकडून चौकशी केली जाणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”दीपिका रात्रभर घरी नव्हती, रात्रभर एका हॉटेलमध्ये वास्तव्य” date=”26/09/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ] दीपिका रात्रभर घरी नव्हती, रात्रभर एका हॉटेलमध्ये वास्तव्य, मीडियाला गुंगारा देत एनसीबीच्या कार्यालयात [/svt-event]

[svt-event title=”एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंकडून दीपिकाची चौकशी ” date=”26/09/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दीपिका 15 मिनिटं आधीच एनसीबी कार्यालयात पोहोचली” date=”26/09/2020,9:59AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दीपिका पदुकोण एनसीबी कार्यालयात दाखल” date=”26/09/2020,9:58AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

दीपिका आणि मॅनेजर करिश्मा यांची समोरासमोर चौकशी

तर दुसरीकडे धर्मा प्रोडक्शन्सचे संचालक निर्माता क्षितीज प्रसाद (Dharma Production Director Kshitij Prasad) यांची 20 तासापासून चौकशी सुरु  आहे. त्याशिवाय शुक्रवारी (25 सप्टेंबर) अभिनेत्री रकुल प्रीत सिंहसह दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांना एनसीबीने चौकशी केली होते. या चौकशी दरम्यान दोघींकडूनही अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. ड्रग्ज देवाण-घेवाणीसाठी बनवलेल्या व्हाट्सअॅप ग्रुपची (drug group) ‘अॅडमिन’ दीपिका स्वतः असल्याचे, करिश्माने एनसीबीला सांगितले. त्यामुळे आता दीपिकाच्या अडचणींत वाढ झाली आहे.

दीपिकाची मॅनेजर करिश्मा हिला आज पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. यावेळी दीपिका पदुकोण आणि करिश्मा प्रकाश यांची समोरासमोर बसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. काल करिश्मा आणि रकुल प्रीत सिंहची एकत्र चौकशी करण्यात आली होती.

क्षितीज प्रसादकडून मोठ्या नावांचा खुलासा

तर निर्माता क्षितीज प्रसाद यांनी चौकशीत अनेक मोठ्या नावांचा खुलासा केला आहे. यात अनेक बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. रकुल प्रीत सिंहने चौकशीदरम्यान क्षितीज प्रसादचे नाव घेतले होते. क्षितीज अनेकांना ड्रग्ज उपलब्ध करुन देण्याचे काम करायचा, असे रकुल प्रीतने सांगितले आहे.  (Actress Deepika Padukone,  Sara Ali Khan, Shraddha  Kapoor Ncb Investigation In Drugs Case Live Updates)

करण जोहरकडून खुलासा 

या सर्व प्रकरणानंतर चित्रपट दिग्दर्शक करण जोहर याने एक पत्रक जारी केलं आहे. ‘माझ्या घरात ड्रग्स पार्टी झाली नाही. माझ्यावर होत असलेले आरोप खोटे आहेत. क्षितीज रवी प्रसाद आणि अनुभव चोप्रा यांचा धर्मा प्रॉडक्शनशी काहीही संबंध नाही’, असं करण जोहर स्पष्ट केले आहे.

सुशांत प्रकरणात एनसीबीकडून दोन एफआयआर दाखल

सुशांत प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत दोन एफआयआर दाखल केल्या आहेत. तर याच प्रकरणात रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), शौविक चक्रवर्ती आणि ड्रग्ज तस्करांच्या चौकशीदरम्यान ज्यांची नावे समोर आली आहेत त्यांनाही एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. 50 बॉलिवूड सेलिब्रिटी सध्या एनसीबीच्या रडारवर आहेत. यात अनेक प्रसिध्द अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि बी-ग्रेड चित्रपटाच्या निर्मात्यांची नावे असल्याचे म्हटले जात आहे.

जया साहाच्या चौकशी दरम्यान दीपिका पदुकोण, सिमॉन खंबाटा (Simone khambata) आणि करिश्मा प्रकाश यांची नावे समोर आली आहेत. तर, रकुलप्रीत सिंह आणि सारा अली खान यांची नावे रिया चक्रवर्तीने घेतली होती. यापैकी करिश्मा प्रकाश दीपिका पदुकोणची मॅनेजर असून, तिने दीपिकासाठी ड्रग्जची सोय केली होती. (Actress Deepika Padukone, Sara Ali Khan, Shraddha  Kapoor Ncb Investigation In Drugs Case Live Updates)

संबंधित बातम्या : 

दीपिका, सारा, श्रद्धाची NCB कडून चौकशी, ‘हे’ प्रश्न विचारले जाण्याची शक्यता

दीपिका पदुकोणची डिलीट केलेली चॅट एनसीबीकडे कशी? WhatsApp कडून खुलासा

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.