मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे दीपिका पादुकोण हिचे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण हिचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले. दीपिका पादुकोण आणि शाहरूख खान (Shah Rukh Khan) हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. दीपिका पादुकोण हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
विशेष म्हणजे दीपिका पादुकोण ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी शाहरूख खान याच्या मन्नत बंगल्याच्या जवळच प्लॅट खरेदी केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांमध्येच आता शाहरूख खान याचे शेजारी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे होणार आहेत.
या फ्लॅटची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. सध्या सोशल मीडियावर दीपिका पादुकोण हिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क दीपिका पादुकोण ही भडकताना दिसत आहे. दीपिका पादुकोण हिचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ साधारण एक महिन्यापूर्वींचा आहे. मात्र, आता तो व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मनीष मल्होत्रा याच्या फॅशन शोमधील असल्याचे सांगितले जात आहे.
या फॅशन शोमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह याचा रॅंप वॉक होता. आपल्या पतीला सपोर्ट करण्यासाठी या रॅंप वाॅक शोमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह याची आई पोहचली होती. या व्हिडीओमध्ये पापाराझी यांच्यावर दीपिका पादुकोण ही भडकताना दिसत आहे. काही पापाराझी हे दीपिका पादुकोण हिच्यामागे गेले.
यावेळी फोटोसाठी थांबण्याची विनंती करताना पापाराझी हे दिसले. मात्र, यावेळी दीपिका पादुकोण ही भडकताना दिसली आणि म्हणाली की, हे बॅक स्टेज आहे आणि तिथे येण्यास परवानगी नाहीये….आता हाच दीपिका पादुकोण हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
काही लोकांनी दीपिका पादुकोण हिचा सपोर्ट करण्यास देखील सुरूवात केलीये. मात्र अनेकांना दीपिका पादुकोण हिचे हे बोलणे अजिबातच आवडले नसल्याचे दिसत आहे. एकाने कमेंट करत म्हटले की, काय झाले असते एका फोटोसाठी पोझ दिली असतील तर. दुसऱ्याने लिहिले की, बाॅलिवूडच्या कलाकारांच्या याच स्वभावामुळे चित्रपट चालत नाहीयेत.