दीपिका कक्कर हिच्यानंतर कोणाच्या प्रेमात शोएब इब्राहिम?, थेट म्हणाला, जेंव्हा तुला बघतो…
अभिनेत्री दीपिका कक्करने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे दीपिका कक्कर हिने अनेक हीट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या. दीपिका कक्करचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. मात्र, शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न झाल्यापासून दीपिका कक्कर ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे.
अभिनेत्री दीपिका कक्कर हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. दीपिका कक्करची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मात्र, शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्ना झाल्यापासून दीपिका कक्कर ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. नेहमीच दीपिका कक्कर हिला विचारण्यात येते की, तुम्ही अभिनय सोडला का? मात्र, यावर भाष्य करणे टाळताना दीपिका कक्कर दिसते. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केले. 2018 मध्ये शेवटी दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांनी केले केले. आता सहा वर्ष यांच्या लग्नाला झाले.
दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांचा एक मुलगा देखील आहे. नुकताच शोएब इब्राहिम याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, मी जेंव्हा याला पाहतो, त्यावेळी मी प्रेमात पडतो… शोएब इब्राहिम याने हे त्याच्या मुलाबद्दल म्हटले आहे. शोएबने मुलगा रूहान याच्यासोबतचा खास फोटो शेअर केलाय.
आता शोएब इब्राहिम याने शेअर केलेल्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. जरी दीपिका कक्कर ही मोठ्या पडद्यापासून दूर असली तरीही ती व्लॉगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या कायमच संपर्कात असते. आपल्या खासगी आयुष्याबद्दल ती अपडेट शेअर करताना दिसते.
काही दिवसांपूर्वीच रूहानच्या बर्थडेची एक झलकही दीपिका कक्कर हिने आपल्या चाहत्यांना दाखवली. दीपिका कक्कर ही सध्या मुलगा रूहान आणि शोएब इब्राहिम याच्या कुटुंबाला वेळ देताना दिसत आहे. दीपिका कक्कर हिची ननंद सबा हिने नुकताच मुंबईमध्ये एक हॉटेल सुरू केले आहे. सबाच्या हॉटेलची झलक दीपिकाने दाखवली.
दीपिका कक्कर हिने शोएब इब्राहिम याच्या लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारला आहे. सुरूवातीला या लग्नानंतर दीपिका कक्कर हिच्यावर जोरदार टीका देखील केली गेली. दीपिका कक्कर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करते. दीपिका कक्कर ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.