‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचे निधन, तरुण वयातच घेतला जगाचा निरोप
अभिनेत्री दिव्या सेठ शाहने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. अभिनेत्रीच्या या पोस्टनंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. ही पोस्ट पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. अभिनेत्रीच्या लेकीचे अवघ्या कमी वयात निधन झाले.
प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या सेठ शाहने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी धमाका केलाय. मात्र, सध्या बॉलिवूड क्षेत्रातून एक अत्यंत हैराण करणारी आणि वाईट बातमी पुढे येताना दिसतंय. अभिनेत्री दिव्या सेठ यांची मुलगी मिहिका सेठ हिचे निधन झाले. मिहिका सेठ हिचे अत्यंत कमी वयात निधन झाल्याने आता सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. मिहिका सेठ हिचे निधन 5 ऑगस्ट 2024 रोजी झाले. दिव्या सेठ यांनी लेकीच्या निधनानंतर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. लोक या पोस्टवर कमेंट करून श्रद्धाजंली वाहताना देखील दिसत आहेत.
दिव्या सेठ यांनी लिहिले की, अत्यंत दु:खाने सांगावे लागत आहे की, आमची लाडकी मिहिका आता आमच्यासोबत नाहीये. 5 ऑगस्ट 2024 रोजी तिने या जगाचा निरोप घेतला. दिव्या आणि तिचा पती सिद्धार्थ शाह यांनी एक नोट जारी केलीये. मिहिका ही बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याचे देखील सांगितले जाते.
या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी म्हटले आहे की, आम्ही तुमच्या दु:खामध्ये सहभागी आहोत. एका लिहिले की, हे दु:ख किती मोठे असेल याची कल्पनाही करता येत नाही. मिहिका हिची प्रार्थना सभा 8 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आलीये. मिहिका ही आजारी असल्याची चर्चा आहे तर काहीजण तिला ताप आल्याचे तिचे निधन झाल्याचे म्हणताना दिसत आहेत.
दिव्या सेठ यांनी शेअर केलेली ही पोस्ट पाहून लोक हैराण झाले. दिव्या सेठने मोठा काळ गाजवला आहे. दिव्या सेठ सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही त्या दिसतात.