गांगुलीसह 3 विवाहित पुरुषांसोबत होते अफेअर, आता 49 व्या वर्षी अडकणार लग्नबंधनात
बॉलिवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेकदा प्रेमाचा दरवाजा ठोठावला पण त्यांना प्रेम मिळू शकले नाही, प्रेमात अनेकदा निराशा हाती लागते. बॉलिवूडमध्ये अफेअर असणं हे काही नवीन गोष्ट नाही. अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री जिने १० वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करत आपल्या कामाचा ठसा उमटवला. आता ती विवाह करणार आहे.
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आहेत ज्या अजूनही अविवाहित आहेत. 90 च्या दशकातील अशीच एक बॉलीवूड अभिनेत्री जी अनेक वर्ष अविवाहित होती पण आता ती वयाच्या ४९ व्या वर्षी विवाहबंधनात अडकणार आहे. फिल्मी दुनियेत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी योग्य वेळी लग्न केले आणि सेटल झाले. पण असे काही स्टार्स आहेत जे अजूनही बॅचलर आहेत. आम्ही तुम्हाला अशाच एका टॉप अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत.
चित्रपटसृष्टीत असे अनेक स्टार्स आहेत जे अजूनही बॅचलर आहेत. मगे ते बॉलीवूड असो की साऊथ. पण एका अभिनेत्रीने अभिनयाने आपला ठसा उमटवला आहे. ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आता 49 वर्षी विवाह करणार आहे. तिच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले. या अभिनेत्रीने तीन वेळा कोणाला तरी हृदय दिले पण ते नाते तुटले. आता ती लवकरच लग्न करण्याचा विचार करत असल्याची बातमी आहे. तिच्या लग्नाबद्दल तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. ती कोणाशी लग्न करणार हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. या अभिनेत्रीने तिच्या काळात अनेक बड्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे आणि अनेक हिट चित्रपटही दिले आहेत.
बॉलीवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीत धुमाकूळ घालणारी ही 49 वर्षीय अभिनेत्री 90 च्या दशकात खूप लोकप्रिय होती. तिने सलमान खान, शाहरुख खान आणि संजय दत्त यांसारख्या अनेक बड्या बॉलिवूड स्टार्ससोबत काम केले आणि आपल्या अभिनयाने खास छाप पाडली. साऊथमध्येही तिचा मोठा चाहतावर्ग आहे, विशेषत: जेव्हा तिने मेगास्टार चिरंजीवी आणि रजनीकांत यांसारख्या सुपरस्टार्ससोबत चित्रपट केले होते. तिचे नाव तीन विवाहित पुरुषांशी देखील जोडले गेले होते. परंतु ती लग्न करू शकली नाही.
नगमाने ‘यलगार’, ‘बागी’ आणि ‘सुहाग’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. नगमा हिचे खरे नाव नंदिता अरविंद मोरारजी आहे. तिने 1990 मध्ये सलमान खानसोबत ‘बागी: अ रिबेल फॉर लव्ह’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सातवा चित्रपट होता, ज्यामुळे नगमा रातोरात लोकप्रिय झाली. नगमाने तिच्या करिअरमध्ये 10 वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी आणि भोजपुरी यांचा समावेश आहे. तिने 100 हून अधिक चित्रपट केले आहेत.
नगमाची आई सीमा यांनी आधी पतीशी घटस्फोट घेतला आणि नंतर चित्रपट निर्माता चंदर साधना यांच्याशी लग्न केले होते. नगमाला ज्योतिका आणि रोहिणी या दोन बहिणी आहेत. त्या देखील फिल्म इंडस्ट्रीत काम करतात. नगमाने वडिलांच्या सांगण्यावरून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ती तिच्या व्यावसायिक जीवनात यशस्वी होती, परंतु तिच्या वैयक्तिक जीवनात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिचे नाव अनेक अभिनेते आणि क्रिकेटपटूंशी जोडले गेले. अफवांवर विश्वास ठेवला तर तिचे सौरव गांगुलीसोबत अफेअर होते आणि दोघेही काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र जेव्हा गांगुलीच्या पत्नीला याची माहिती मिळाली तेव्हा त्यांचे नाते तुटले.
View this post on Instagram
नगमाचे नाव तामिळ अभिनेता शरत कुमारसोबत जोडले गेले, पण हेही फार काळ टिकले नाही. त्यानंतर नगमाचे नाव भोजपुरी अभिनेता रवी किशनसोबतही जोडले गेले. पण रवीच्या वैवाहिक जीवनातील अडचणींमुळे हे नातेही संपुष्टात आले. यानंतर नगमाने चित्रपटांपासून दूर जाऊन राजकारणात सक्रिय झाली. सध्या ती काँग्रेस पक्षाची सरचिटणीस आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर नगमा लवकरच लग्न करणार आहे. ती एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याला डेट करत आहे आणि दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.