नाईलाजाने केलेल्या लग्नाचे अभिनेत्रीला भोगावे लागले परिणाम, नशेत नवऱ्याने केलेला गोळीबार आणि…

Love Life | बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी खासगी आयुष्यात अनेक कठीण दिवसांचा केलाय सामना... नाईलाजाने केलेल्या लग्नानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात आले अत्यंत वाईट दिवस... नशेत असलेल्या नवऱ्याने गोळीबार करत संपवलं पूर्ण कुटुंब... खडतर होतं अभिनेत्रीचं आयुष्य...

नाईलाजाने केलेल्या लग्नाचे अभिनेत्रीला भोगावे लागले परिणाम, नशेत नवऱ्याने केलेला गोळीबार आणि...
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 12:38 PM

झगमगत्या विश्वातील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या चाहत्यांना माहिती नाहीत… पण जेव्हा बॉलिवूडमधील काही असे रहस्य समोर आले जे ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला… विशेषतः अभिनेत्रींना त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक संकटांचा आणि वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला… हिंदी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल असणाऱ्या अभिनेत्रीसोबत देखील असंच काही झालं आहे. यशाच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्रीने निर्मात्यासोबत लग्न केलं आणि काही वर्षांनंतर पतीच्याच हातून अभिनेत्रीचा अंत झाला. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दिवगंत अभिनेत्री सईदा खान आहेत.

सईदा खान यांनी नाईलाजाने निर्माते ब्रज सदाना यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर काही वर्ष अभिनेत्रीच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही आनंदाने सुरु होतं. सईदा खान स्वतः त्यांच्या आनंदी आयुष्याबद्दल चाहत्यांना सांगत होत्या… पण एक रात्र अशी आली जेव्हा सईदा खान यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबाचा देखील अंत झाला.

सईदा खान यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1949 मध्ये एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. लहानपणापासून अभिनेत्री व्हायचं सईदा खान याचं स्वप्न होतं. अभिनेत्रीने स्वतःचं स्वप्न देखील पूर्ण केलं. 1961 मध्ये सईदा खान यांनी ‘कांच की गुडिया’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सईदा खान यांनी प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार, किशोर कुमार, राजकुमार यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर केली.

हे सुद्धा वाचा

एक काळ असा होता जेव्हा चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर सईदा खान यांचं राज्य होतं. पण कालांतराने सईदा खान यांना सिनेमांसाठी ऑफर मिळणं बंद झालं. अशात त्यांनी सी ग्रेड सिनेमांमध्ये देखील काम करण्यास सुरुवात केली. कारण सईदा खान यांना त्यांच्या आई आणि बहिणीचा देखील सांभाळ करायचा होता.

अशात सईदा खान यांच्या पतीने मेहुणी आणि सासूबाईंची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. सईदा खान आणि ब्रज सदाना यांना दोन मुलं होती. त्यांच्या मुलीचं नाव नम्रता असं होतं, तर मुलाचं नाव कमल सदाना आहे.. कमल सदाना यांनी देखील बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

सईदा खान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक वेळ अशी आली जेव्हा ब्रज यांनी निर्मित केलेले सर्व सिनेमे फ्लॉप होऊ लागले आणि ब्रज नशेच्या आहारी गेले. ब्रज कायम नशेत असताना वाद घालायचे. अशात सईदा खान आणि ब्रज सदाना यांच्यातील भांडणांचं प्रमाण दिवसागणिक वाढलं होतं. दरम्यान, एक रात्र अशी आली जेव्हा सईदा खान यांचं निधन झालं…

मुलगा कमल सदाना यांच्या वाढदिवसानिमित्त सईदा खान यांनी घरी एक पार्टी ठेवली होती. पार्टीत ब्रज यांनी अधिक दारु प्यायल्यामुळे सईदा खान यांच्यासोबत वाद वाढत गेले. तेव्हा नशेत असलेल्या ब्रज यांनी पत्नीवर गोळीबार केला. त्यानंतर समोर आलेल्या मुलीवर आणि मुलावर देखील ब्रज यांनी गोळ्या झाडल्या. या धक्कादायक घटनेत मुलगा कलम सदाना यांचे प्राण वाचले. पण सईदा खान आणि मुलगी नम्रता यांचं निधन झालं…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.