प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पायाच्या बोटाला काय झालं?, एवढ्या गंभीर दुखापतीनंतरही…; अभिनेत्रीची व्हायरल पोस्ट काय?

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पायाला मालिकेच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली. मात्र त्यानंतरही तिने हार न मानता शूटिंग पूर्ण केले अन् त्यानंतर नाटकाच्या सेटवर...

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पायाच्या बोटाला काय झालं?, एवढ्या गंभीर दुखापतीनंतरही...; अभिनेत्रीची व्हायरल पोस्ट काय?
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 12:58 PM

मुंबई : शो मस्ट गो ऑन… हे आपल्यापैकी अनेकांना माहीत असेलच. काहीही संकट अथवा प्रॉब्लेम आला तरी थांबायचं नाही, हातातलं काम पूर्ण करायचं, पुढे जायचं. अनेक कलाकारही हेच करताना दिसतात. काहीही अडचण आली तरी ते थांबत नाहीत, काम करत राहतात. असाच एक अनुभव अभिनेत्री हेमांगी कवीलाही ( Actress Hemangi Kavi) आला. तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली तरी तिने न थांबता काम पूर्ण केलं. त्याबद्दलची एक पोस्ट तिने शेअर केली आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान तिला दुखापत झाल्याचं तिने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहीलं आहे. पण ही दुखापत होऊनही हेमांगीने चित्रीकरण थांबवल नाही. एवढंच नव्हे तर तिच्या नाटकाचा प्रयोगही तोंडावर आला होता. जखम चिघळलेली असतानाही तिने काय केलं, नक्की काय घडलं हे सर्व हेमांगीने पोस्ट करून शेयर केलं आहे.

काय म्हणाली हेमांगी ?

परवा ‘मन धागा धागा’ च्या set वर scene करताना माझ्याकडूनच माझ्या पायाला दुखापत झाली. पायरी चढत असताना माझा अंदाज चुकला आणि पाय पायरीला जोरात आपटला. पायाच्या बोटाचं नख माझ्याच बोटात मागच्या मागे घुसलं. असली कळ गेली डोक्यात. Shooting थांबवून आराम करायची ती वेळ नव्हती कारण already खूप उशीर झाला होता. Pack up ची वेळ उलटून गेली होती. म्हटलं आता जर मी माझ्या पायाला गोंजारत बसले तर जशी ती कळ माझ्या डोक्यात गेलीए तशी मी सगळ्यांच्या डोक्यात जाईन. काही नाही काही म्हणत scene पूर्ण केला. Pack up झालं. पाय झणझणत होता. चालवत ही नव्हतं. चप्पल घलता येत नव्हती. कशी बशी घरी पोचले. घरी आल्यावर बघते तर काय पाय टम्म सुजला होता. Fresh होऊन बर्फाचा शेक दिला पण मी इतकी थकले होते की मी झोपी गेले. काही वेळापुरतीच. थोड्या थोड्या वेळाने सारखी जाग येत होती. पाय प्रचंड झोंबत होता.

पण याही पेक्षा पाय जर असाच राहीला तर उद्याचा नाटकाचा प्रयोग कसा करणार या विचाराने अस्वस्थ होऊन झोपमोड होत होती. सकाळी पुन्हा बर्फ लावला. नाटकाच्या rehearsal ला पोचले. मी लंगडतेय पाहून सगळेच काळजीत पडले. माझ्याही आणि उद्याच्या प्रयोगाच्याही! तिथेही मनाचा हीय्या करून आई गं आई गं करत rehearsal केली. आराम न दिल्यामुळे जखम खवळली. आता म्हटलं हीचा दादापूता नाही केला तर ही मला उद्याचा प्रयोग करू द्यायची नाही. घरी गेल्या गेल्या मैत्रिणीने सुचवलेला तुरटी-हळदीची लेप लावला पायाला. दुखणं शांत झालं. Rehearsal चांगली झाली होती म्हणून झोप ही पटकन लागली आणि चांगली झाली.

प्रयोगाचा दिवस उजाडला. रक्त साकळून बोट काळं निळं झालं होतं. मनात म्हटलं nothing doing. काल जशी लंगडत तालिम केली तसाच आज प्रयोगही करायचा. लंगडल्यामुळे दुसरा पाय ही दुखू लागला. Theatre ला पोचले. Make up, Costume घालून ready झाले. सगळे माझ्या दुखण्याचं, लंगडण्याचं सांत्वन करत होते.

मी विंगेत उभी होते. तिसरी घंटा झाली. पडदा उघडला. संगीत सुरू झालं. Lights आले आणि मी entry घेतली. Entry लाच मी धावत train पकडतेय असा scene आहे नाटकात. मी धावले आणि त्यानंतरचे २- २.१५ तास मी रंगमंचावर तरंगत होते. मला दुखापत झालीए. माझे पाय दुखताएत. हवा लागली तरी सहन होत नाहीए हे सगळं सगळं विसरून गेले मी. काय गंमत झाली?…

पुढे हेमांगीने लिहीलं आहे ‘ काही तासांपूर्वी विव्हळणारी मी जणू काही झालंच नाही अशी वावरले. जादू व्हावी तसं. पण खरंच आहे ही जादूच असते. कलेची जादू. परकाया प्रवेशाची जादू. त्यावेळी साकारत असलेल्या पात्रामध्ये आपण उरतच नाही. त्यामुळे आपली दुःखं, यातना, क्लेश शारिरीक आणि मानसिक सुद्धा काही काही उरत नाही आपल्यात. या गोष्टीचा मला फायदा झाला.

प्रयोग संपल्यावर मला जाणवलं माझं दुखणं खुप कमी झालं होतं. या क्षेत्राची मला हीच गोष्ट आवडते. वेगवेगळी characters केल्यामुळे, करताना आपल्या वैयक्तिक दुखांमधून पटकन सावरता येत आम्हांला. मला वाटतं फक्त अभिनय क्षेत्रच नाही तर जगातली कुठलीही कला तुम्हांला सावरायला मदतच करते. तिने पुढे केलेला मदतीचा हा हात धरायचा की नाही हे आपल्या हातात असतं.

‘जन्मवारीचा’ पहीला प्रयोग माझ्या कायम स्मरणात राहील. कलादेवता, नाट्यदेवता कालच्या सारखी कृपा कायम ठेवा माझ्यावर! ‘

तिची ही पोस्ट अनेकांना आवडली असून बऱ्याच जणांनी तिचं कौतुक करत तिला लवकर बरं वाटू दे अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.