‘या’ मोठ्या अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली…
एका मोठ्या अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर झालाय. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती शेअर केलीये. आता अभिनेत्रीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. अभिनेत्रीची पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय.
हिना खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हिना खान हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. अक्षरा नावाने खरी ओळख हिना खान हिला मिळाली आहे. हिना खान ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना हिना खान दिसते. हिना खान मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. नुकताच आता हिना खान हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. आता हिना खान हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
हिना खान हिने शेअर केलेली ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय. हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सर झालाय, याबाबतच तिने खुलासा आपल्या पोस्टमध्ये केला. हिना खान हिची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. चाहते तिच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.
हिना खान हिने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले की, सर्वांना हॅलो…सध्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्यावर मी सर्व चाहत्यांना सांगू इच्छिते की, मी ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. मी ठिक आहे. मी खूप जास्त शक्तीशाली आहे आणि मी लवकरच या आजारीतून बाहेर पडेल. सध्या माझ्यावर उपचार सुरू आहेत.
View this post on Instagram
या आजारातून बरे होण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे देखील हिना खान हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आता हिना खान हिच्या या पोस्टवर चाहते हे कमेंट करत तिला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. हिना खान ही गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.
हिना खान ही बिग बॉसमध्येही धमाका करताना दिसली होती. हिना खान काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यामध्ये ती पीरियड्समध्ये काम करण्याचा अनुभव सांगताना दिसली. यावेळी तिने खुलासा केला की, प्रचंड वेदना असताना देखील शूटिंग करावी लागते. 40 डिग्री सेल्सअस तापमानात आपण पीरियड्समध्ये काम करत असल्याचेही तिने म्हटले होते.