हिना खान हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. हिना खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे हिना खान ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. हिना खान हिला खरी ओळख ही अक्षराच्या भूमिकेतून मिळालीये. हिना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते. हिना खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत थेट सांगितले की, तिला ब्रेस्ट कॅन्सर झालाय.
हिना खान हिने शेअर केलेली पोस्ट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. हिना खान ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात हिना खान हिच्यावर उपचार सुरू आहेत. हिना खान हिचे चाहते तिच्या चांगल्या आरोग्यासाठी सातत्याने प्रार्थना करताना दिसत आहेत. हिना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसत आहे.
हिना खान हिने नुकताच एक पोस्ट शेअर केलीये. हिना खान हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, माझ्या प्रवासाची एक खिडकी आहे, त्या खिडकीमधून मी बघत आहे. माझी ही पोस्ट त्या सर्व महिला आणि पुरूषांसाठी आहे, जे कॅन्सरसोबत लढत आहेत. खरोखरच ही एक अत्यंत मोठी लढाई आहे, ज्यामध्ये खूप सारी हिंमत लागते.
मला वाटते की, माझा प्रवास देखील पूर्ण हिंमतीने होईल. हा हे लक्षात ठेवा की, भलेही आपल्याला अनेक निशान मिळालेले असतील. परंतू आपल्याला कधीच घाबरायचे नाहीये. निशान आहे, ते निघून जातील. परंतू कधीच घाबरू नका. आता हिना खान हिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. हिना ही लढाई यशस्वीपणे लढणार असल्याचे सातत्याने म्हणताना दिसत आहे.
हिना खान हिच्यासोबत तिची आई आणि बॉयफ्रेंड आहेत. लेकीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समजल्यापासून तिची आई सतत रडत असल्याचे देखील सांगितले जातंय. हिना खान हिने मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. यासोबतच तिने काही वेब सीरिजमध्येही भूमिका केल्या आहेत. हिना खान बिग बॉसमध्येही धमाला करताना दिसली होती.