हिना खान हिचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते भावूक, अभिनेत्री भर पावसामध्येच…
अभिनेत्री हिना खान सध्या तूफान चर्चेत आहे. हिना खान ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या लाईफचे प्रत्येक अपडेट शेअर करत आहे. हिना खान हिच्यावर ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. हिनाने पोस्ट करत याबद्दलची माहिती शेअर केली होती.
अभिनेत्री हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सर झालाय. काही दिवसांपूर्वीच हिना खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. हिना खान हिने स्पष्ट केले की, तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला. सध्या हिना हिच्यावर उपचार सुरू आहेत. हिना खान हिने एक मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. हिना खान हिला खरी ओळख ही अक्षराच्या भूमिकेतून मिळालीये. बिग बॉसमध्येही धमाका करताना हिना खान ही दिसली होती. हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हिना खान आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.
ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यापासून हिना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. नुकताच हिना खान हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये हिना खान ही पावसामध्येही जिम करण्यासाठी जाताना दिसत आहे. यासोबतच हिना खान हिने महत्वाची माहिती ही देखील आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये.
हिना खान हिने लिहिले की, तुमच्याकडे कोणते कारण आहे?… चांगल्या जीवनशैलीसाठी व्यायाम किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल खूप महत्त्वाची आहे. पण जेंव्हा एखादी व्यक्ती आजारातून जात असते, तेंव्हा शारीरिक व्यायाम अधिक महत्त्वाचा आणि खूप जास्त परिणामकारण असतो. नेहमी व्यायाम केल्याने फक्त शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यही चांगले राहते.
View this post on Instagram
आपला मेंदू निरोगी असणे खूप महत्वाचे आहे. मला कीमोसोबतच आता न्यूरोपॅथिकचा देखील खूप जास्त त्रास होतोय. माझे पाय आणि बोटे अनेकदा सुन्न होतात. बऱ्याच वेळा व्यायाम करताना माझा तोल यामुळे जातो. मी पाय सुन्न झाल्याने खाली पडते. मात्र, त्यानंतर मी परत कामावर लक्ष केंद्रित करते. मी स्वत:ला पडून देणार नाहीये…मी प्रत्येकवेळी उठते आणि जास्त ताकद दाखवते.
प्रत्येकवेळी मला जेंव्हा वाटते की, मी आता उठून काम करू शकणार नाहीये, त्यावेळी मी माझी पूर्ण ताकद लावते. माझे मन आणि माझ्या इच्छाशक्तीपेक्षा काय आहे? तर मग व्यायाम करण्यासाठी तुमच्याकडे काय कारण आहे? आता हिना खान हिने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. लोक या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.