ब्रेस्ट कॅन्सरनंतर हिना खान हिच्यावर मोठी शस्त्रक्रिया, अभिनेत्री भयंकर त्रासात, म्हणाली…
हिना खान ही कायमच चर्चेत असणारी टीव्ही अभिनेत्री आहे. टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ हिना खान हिने गाजवला आहे. आजही लोक हिना खान हिला अक्षरा नावानेच ओळखतात. हिना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
हिना खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे हिना खान हिने अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना हिना खान दिसते. हिना खान हिला आजही लोक अक्षरा याच नावाने ओळखतात. हिना खान हिने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून तिसऱ्या टप्प्यात आहे. यानंतर ती सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतंय.
आता ब्रेस्ट कॅन्सरनंतर हिना खान हिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलीये. हिना खानने इंस्टावर फोटो शेअर केले आहेत. यामधील एका फोटोमध्ये हिना खान ही हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेली दिसत आहे. या फोटोमध्ये फक्त हिना खान हिचा हात दिसत आहे. नुकताच हिना खानवर शस्त्रक्रिया झालीये. रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
फोटो शेअर करत हिना खान हिने लिहिले की, मी सतत खूप जास्त त्रासामध्ये आहे. प्रत्येक मिनिटाला मला त्रास होतोय. जो व्यक्त स्माईल करत आहे, तो आताही खूप जास्त दुखात आहे. तो व्यक्ती सांगत नाहीये, परंतू तो अजून त्रासामध्येच आहे. तो व्यक्ती हे म्हणत आहे की, मी ठीक आहे. मात्र, तो त्रासात आहेच. हिना खानवर ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार हा कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये सुरू आहे.
हिनासाठी हॉस्पिटलच्या हाऊसकीपिंगकडून छान नोट देण्यात आलीये, याचाही एक फोटो हिना खान हिने सोशल मीडियावर शेअर केलाय. त्या नोटवर लिहिण्यात आले की, हिना खान आम्हाला माहिती आहे की, ही सर्जरी तुमच्यासाठी नक्कीच सोपी नव्हती. परंतू, आम्हाला आशा आहे की, तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल.
आता हिना खान हिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. हिना खान हिने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, काहीही झाले तरीही ती हार मानणार नाहीये. यासोबतच जिममध्ये व्यायाम करतानाही हिना खान ही दिसली होती. चाहते सतत हिना खान हिच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना देखील दिसत आहेत.