जान्हवी कपूरचा मोठा खुलासा, म्हणाली, आई श्रीदेवीला मी…
बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. हेच नाही तर जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. जान्हवी कपूर तिच्या पर्सनल लाईफममुळेही चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे जान्हवी कपूर सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही जान्हवी कपूर दिसते. जान्हवी कपूर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर दिसतंय. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे लवकरच लग्न करणार असल्याचे देखील सांगितले जातंय. आता नुकताच जान्हवी कपूर हिने मोठा खुलासा केलाय.
नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये जान्हवी कपूरने मोठा खुलासा केलाय. या मुलाखतीमध्ये जान्हवी कपूर ही आई श्रीदेवीला केलेल्या प्रॉमिसबद्दल बोलताना दिसली. जान्हवी कपूर म्हणाली की, मी आई श्रीदेवीला एक मोठे वचन दिले होते. कोणत्याच चित्रपटासाठी मी कधी टक्कल करणार नाही. आईला मी टक्कल केलेले कधीच आवडणार नाही.
हेच नाही तर पुढे जान्हवी कपूर म्हणाली की, माझ्या आईने माझ्याकडून वचन घेतले होते की, टक्कल कधीच करायचे नाही. मी गुंजन सक्सेना या चित्रपटासाठी केस कट केले होते. त्यावेळी मला ते अजिबात आवडले नव्हते. आयुष्यात कधीच कोणत्याच चित्रपटासाठी टक्कल करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगताना जान्हवी कपूर दिसली.
जान्हवी कपूर कायमच आईची आठवण काढताना दिसते. श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवी कपूरला मोठा धक्का बसला होता. जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, म्हणावा तसा धमाका तिच्या चित्रपटांना करण्यात अजिबात यश मिळत नाहीये. आता हा आगामी चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरेल.
जान्हवी कपूर ही सध्या शिखर पहाडिया याला डेट करतंय. यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. जान्हवी कपूर ही काही दिवसांपूर्वीच शिखर पहाडिया याच्यासोबत विदेशात धमाल करताना दिसले. हेच नाही तर तिरूपती बालाजी मंदिरात देखील अनेकदा हे दर्शनासाठी जातात. लवकरच जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे लग्न करणार असल्याचे सांगितले जाते.