दुसऱ्या धर्माच्या करोडपती अभिनेत्याच्या प्रेमात अभिनेत्री, अखेर लग्नाबद्दल म्हणाली, आम्ही दोघे…

अभिनेत्री जस्मिन भसीन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जस्मिन भसीनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. जस्मिन भसीन ही गेल्या काही वर्षांपासून अभिनेता अली गोनी याला डेट करत आहे. आता तिने नुकताच लग्नाबद्दल मोठा खुलासा केलाय.

दुसऱ्या धर्माच्या करोडपती अभिनेत्याच्या प्रेमात अभिनेत्री, अखेर लग्नाबद्दल म्हणाली, आम्ही दोघे...
Jasmin Bhasin
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 1:58 PM

अभिनेत्री जस्मिन भसीन हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. जस्मिन भसीन ही बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती. विशेष म्हणजे धमाकेदार गेम खेळताना जस्मिन भसीन दिसली. जस्मिन भसीन हिच्या डोळ्यांना मोठी दुखापत काही दिवसांपूर्वीच झाली. जस्मिन भसीन हिचे फोटो पाहून तिचे चाहतेही हैराण झाले होते. सर्वजण तिच्यासाठी प्रार्थना करताना दिसले. जस्मिन भसीन ही अली गोनी याला काही वर्षांपासून डेट करत आहे. हेच नाही तर अनेकदा हे दोघे एकत्र दिसतात. जस्मिन भसीन आणि अली गोनी यांना सतत विचारले जाते की, लग्न कधी करणार…आता यावर बोलताना जस्मिन भसीन ही दिसली आहे.

जस्मिन भसीन हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये लग्नाबद्दल मोठा खुलासा करताना जस्मिन भसीन दिसली. जस्मिन भसीन हिला विचारण्यात आले की, तू अली गोनी याच्यासोबत लग्न कधी करणार आहे? यावर जस्मिन भसीन म्हणाली की, लवकरच करू…सध्या आम्ही दोघे खूप जास्त आनंदी आहोत…

आम्ही आमच्या कामात व्यस्त आहोत. सध्या कामात व्यस्त असल्याने आम्ही एकमेकांना भेटू देखील शकत नाहीत. सध्या अली गोनी हा लाफ्टर शेफमध्ये दिसतोय. अली गोनी याला भेटण्याासाठी लाफ्टर शेफच्या मंचावर काही दिवसांपूर्वीच जस्मिन भसीन ही पोहोचली होती. त्यावेळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.

जस्मिन भसीन आणि अली गोनी डेट करत आहेत. अली गोनी हा करोडो संपत्तीचा मालक आहे. हेच नाही तर जस्मिन भसीन हिने तिच्या घरी काही दिवसांपूर्वीच खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला भारती सिंह आणि अली गोनी हे पोहोचले होते. यावेळी सर्वजण धमाल करताना दिसले.

जस्मिन भसीन आणि अली गोनी यांनी काही दिवसांपूर्वीच अत्यंत खास असे फोटोशूट केले. त्यांचे हे फोटोशूट चाहत्यांना आवडले होते. जस्मिन भसीन ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना जस्मिन भसीन  दिसते. सतत जस्मिन भसीन हिला लग्नाबद्दल विचारले जाते.