थर्ड क्लास लोक… लाज आणली.. कुत्र्याच्या पिल्लावर सलग तीन दिवस…; अखेर अभिनेत्रीने वाचवला जीव अन्…
मुंबईतील नायगावमध्ये एका दीड वर्षाच्या कुत्र्याच्या पिल्लावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अभिनेत्रीने या पिल्लाची सुटका करून पोलिसात तक्रार दाखल केली. तसेच या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.
या जगात कधी काय घडेल काही सांगता येत नाही. लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत सर्वांच्याच बाबतीत अत्याचार होण्याच्या घटना या वारंवार आपण ऐकतो , वाचतो. पण या जगात इतक्या क्रूर घटना घडतात की आपण कल्पना पण नाही करू शकत. मुक्या जनावरांच्या बाबतीतही अशाच काहीशा घटना घडत असतात. ज्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करावासा वाटतो.
अशाच एका छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लासोबत घडलेल्या संतापजनक घटनेबद्दल एका अभिनेत्रीने आवाज उठवला आहे. या अभिनेत्रीने दखल घेत अखेर या पिल्लाचा जीव वाचवला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे हे समजून घेऊ.
नेमके प्रकरण काय?
अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी मुंबईच्या नायगाव उपनगरातून एका दीड वर्षाच्या कुत्र्याच्या पिल्लाची सुटका केली. त्यांनी खुलासा केला की एका पुरूषाने या पिल्लाचे क्रूरपणे लैंगिक शोषण केले होते. त्यांनी या विरुद्धात एफआयआर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
View this post on Instagram
कुत्र्याच्या पिल्लासोबत क्रूरपणा
एका व्हिडिओमध्ये, जया यांनी या कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या हातात घेतले आहे. त्यांनी यावेळी सर्व खुलासा केला खुलासा केला. त्या म्हणाल्या की,” काही दिवसांपूर्वी नायगाव येथील एका तरुणीचा फोन आला. तिने सांगितले की, नायगावजवळील तिमरी गावातील एका चाळीत 24 वर्षीय तरुण दीड महिन्याच्या कुत्र्यावर सलग तीन दिवस बलात्कार करत आहे. तरुणाचे हे घृणास्पद वर्तन पाहून तिने सर्वप्रथम त्या मुलाच्या आईकडे याबाबत तक्रार केली. मुलाच्या आईने स्वतःच्या मुलाला पाठिशी घालंत म्हटलं की “तुला काय हवे ते कर.” मी माझ्या मुलाला मतिमंद म्हणवून त्याची सुटका करीन. अस म्हणत त्या बाईने मुलाचे हे घाणेरडं कृत्य लपवण्याचा प्रयत्न केला”
तक्रार करणाऱ्या मुलीलाही आरोपीची धमकी
तसेच पुढे जया यांनी सांगितलं की,” ही घटना गेल्या गुरुवारी संध्याकाळी घडली. याबाबत तक्रार करण्यासाठी शुक्रवारी आम्ही नायगाव पोलिस ठाण्यात पोहोचले असता, तक्रार करणाऱ्या मुलीला त्या मुलाने धमकी दिल्याचे समोर आले. ती मुलगी नायगाव येथे एकटीच राहते. या गुन्हेगार मुलाने मुलीला धमकी दिली की, तिने याबाबत कुठेही तक्रार केली तर तो तिच्याशी आणि तिच्या आईसोबत असेच वागेल. सर्व कुत्र्यांना तो विष देईल अशी धमकी दिली.” ही घटना सांगत त्यांनी आरोपीची विक्षिप्त मानसिक स्थितीबद्दलही सांगितलं आहे.
View this post on Instagram
आरोपीची जामिनावर सुटका
जया भट्टाचार्य यांनी हा सर्व प्रकार सांगत याबद्दल संताप आणि राग व्यक्त केला. पुढे त्या म्हणाल्या “हे फक्त या पिल्लाबद्दल नाही, तर त्या सर्व प्राण्यांबद्दल आणि अगदी काही महिन्यांच्या मुला- मुलींबद्दलही घडत आहे, जे त्यांचे दुःख व्यक्त करू शकत नाहीत, जे स्वतःचे रक्षण करू शकत नाहीत. आम्ही न्यायाची मागणी करतो. ” असं म्हणत त्यांनी त्या पिल्लाबाबत न्याय मागितला आहे. दरम्यान एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला पकडले देखील पण जामिनावर त्याला सोडण्यात आलं.
पिल्लासाठी मागितला न्याय
जया यांनी त्या पिल्लाला त्यांच्या घरी नेले असून त्यांची एक मैत्रीण पशुवैद्यकीय डॉक्टर आहे, ती पिल्लावर उपचार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच तो आरोपी लगेच जामिनावर सुटल्याने आता त्या पिल्लाला न्याय कसा मिळणार याबाबत जया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जया भट्टाचार्य यांना पाठिंबा देताना, अभिनेत्री शिवानी दांडेकर यांनी देखील मदतीचा हात पुढे करत मला त्याच्यासाठी सुरक्षित आणि प्रेमळ घर शोधण्यात मदत करायची आहे असं म्हटलं आहे.