फरार जया प्रदा आल्या समोर, कोर्टात म्हणाल्या, ‘जे काही झालं त्यामध्ये…’, त्यांनी ‘या’ पुरुषावर साधला निशाणा

Jaya Prada | तुरुंगात असलेल्या 'या' पुरुषावर निशाणा साधत जया प्रदा म्हणाल्या, 'जे काही झालं त्यामध्ये...', कोर्टाने फरार घोषित केलेल्या जया प्रदा अखेर समोर आल्या... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया प्रदा यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चर्चा...

फरार जया प्रदा आल्या समोर, कोर्टात म्हणाल्या, 'जे काही झालं त्यामध्ये...', त्यांनी 'या' पुरुषावर साधला निशाणा
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 8:15 AM

नवी दिल्ली | 5 मार्च 2024 : प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री जया प्रदा यांनी रामपूर येथील एमपी एमएलए कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. जयाप्रदा यांनी दाखल केलेली रिकॉल याचिका स्वीकारण्यात आली आहे. एक दोन नाहीतर, सात वेळा वॉरंट बजावल्यानंतरही कोर्टात हजर न राहण्याचं कारण जया प्रदा यांनी सांगितलं आहे. एवढंच नाहीतर, त्यांनी तुरुंगात असलेल्या आझम खान यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि पक्त जया प्रदा यांची चर्चा रंगली आहे.

कोर्टातून बाहेर आल्यानंतर जया प्रदा म्हणाल्या, ‘मला कोर्टाचे आभार मानायचे आहेत. कोर्टाने मला दिलासा दिला आहे. मी दोनदा रामपूरमधून खासदार राहीली आहे. तुम्ही सर्वांनी मला खासदार होण्याचा दर्जा दिला. जनतेने मला खूप प्रेम दिलं. हे प्रकरण कोर्टात आहे, त्यामुळे मी त्यावर जास्त बोलू शकणार नाही.’

पुढे जया प्रदा म्हणाल्या, ‘राजनीती नाही तर, मी लोकांच्या मनात आहे. जनता माझ्या सोबत आहे. जे काही झालं, ते फक्त आणि फक्त माझ्या प्रकृतीमुळे झालं आहे. माझा बीपी हाय झाला होता. शुगर लेवल देखील नियंत्रणात नव्हती. माझ्या कमरेत देखील त्रास होता. किडनी इंफेक्शन होण्याचा धोका होता. त्यामुळे मी डॉक्टरांसोबत फिरत होती. आता देखील माझी प्रकृती ठिक नाही.’

‘कोर्टाचा मी कायम सन्मान केला आहे. मी कायम तुमच्या सोबत असेल. येणाऱ्या दिवसांमध्ये मी तुमच्यासोबत असेल. जेव्हा निवडणूक होते, तेव्हा मी रामपूरमध्ये असते. कोर्टाला मी पुन्हा सांगेल माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा..’ असं देखील जया प्रदा म्हणाल्या.

आझम खान यांच्यावर जया प्रदा यांनी साधला निशाणा…

तुरुंगात बंद असलेल्या आझम खान यांचं नाव न घेता जया प्रदा म्हणाल्या, ‘महिला शक्तीबद्दल प्रत्येक जण बोलत असतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांनी दाखवून दिलं आहे की महिलांचा सन्मान कसा करायाला हवा… मोदी आणि योगी दोघे माझ्या बाजूने उभे आहेत. आम्ही कोणासोबत देखील लढू शकतो. निवडणुकीच्या नावावर ज्यांना माझी बदनामी करायची होती ते करू शकले नाहीत.’

काय आहे प्रकरण?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरही त्यांनी एप्रिल 19 रोजी नूरपूर गावात रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. कार्यक्रमाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यामुळे जया प्रदा यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.