अभिनेत्री जया प्रदा फरार घोषित, अडचणीमध्ये मोठी वाढ, वाचा नेमके प्रकरण काय?, कोर्टाने कारवाई करत..
Jaya Prada : अभिनेत्री जया प्रदा हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. आता एक प्रकरण अभिनेत्री जया प्रदा यांना चांगलेच भोवल्याचे दिसतंय. हेच नाही तर आता थेट कोर्टाकडून जया प्रदा यांना फरार घोषित करण्यात आलंय. मोठे आदेश देखील कोर्टाने जया प्रदा यांना दिले आहेत.
मुंबई : अभिनेत्री जया प्रदा या सध्या मोठ्या वादात सापडल्याचे बघायला मिळतंय. जया प्रदा यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर आता न्यायालयाकडून जया प्रदा यांना फरार घोषित करण्यात आलंय. 2019 लोकसभा निवडणूकीच्या वेळी आचार संहिता प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामपुरमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला. ज्याची सुनावणी हे कोर्टात सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुनावणीसाठी जया प्रदा उपस्थित राहत नाहीत.
हेच नाही तर कितीतरी वेळा कोर्टाकडून समन्स जारी करण्यात आले. जया प्रदाविरोधात कोर्टाकडून वारंट जाहिर करण्यात आले. हेच नाही तर जमात वारंट देखील जारी करण्यात आले. रामपुर पोलिस अधिक्षकांनी देखील जया प्रदा यांना कोर्टात येण्याबाबत आदेश दिले. मात्र, हे सर्व करूनही जया प्रदा कोर्टात हजर झाल्याच नाहीत.
नुकताच पार पडलेल्या मंगळवारच्या सुनावणीमध्ये कोर्टाने थेट जया प्रदा यांना फरार घोषित केले. अधीक्षकांना डेप्युटी एसपीच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करून 6 मार्च 2024 रोजी कोर्टात जया प्रदा यांना हजर करण्याचे निर्देश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. आता एक टीम जया प्रदाचा शोध घेणार आहे.
आता हे स्पष्ट आहे की, जया प्रदा यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. अधिकारी अमरनाथ तिवारी यांनी म्हटले आहे की, जया प्रदा यांच्याविरुद्ध निवडणूक आचारसंहिता भंगाचे प्रकरण रामपूर येथे सुरू आहे. कितीतरी वेळा त्यांच्या विरोधात समन्स पाठवण्यात आलंय. मात्र, असे होऊनही त्या कोर्टात सुनावणीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत.
जया प्रदा यांचा फोन स्विच ऑफ असल्याचे देखील तिवारी यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी जया प्रदा यांच्या विरुद्ध कलम 82 सीआरपीसी अंतर्गत कारवाई करून त्यांना कोर्टात हजर करायचे आहे. 6 मार्च 2024 त्यांना कोर्टात हजर करायचे आहे. जया प्रदा यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.