एखाद्या लहान मुलाप्रमाणे तू आता…, नवऱ्याला असं का म्हणाली काजोल? पोस्ट व्हायरल

Ajay Devgan | लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर कजोल पती अजय देवगन याला म्हणाली, एखाद्या लहान मुलाप्रमाणे तू आता..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल आणि अजय यांच्या नात्याची चर्चा... सोशल मीडियावर काजोल हिची पोस्ट तुफान व्हायरल

एखाद्या लहान मुलाप्रमाणे तू आता..., नवऱ्याला असं का म्हणाली काजोल? पोस्ट व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 3:55 PM

अभिनेता अजय देवगन याचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्याचा वाढदिवस असल्यांमुळे फक्त चाहतेच नाहीतर, सेलिब्रिटी देखील खास अंदाजात अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशात पती अजय याला शुभेच्छा देण्यासाठी काजोल देखील मागे राहिलेली नाही. काजोल हिने देखील खास अंदाजात अजय देवगन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत काजोल हिने अजय याचा खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

फोटोमध्ये अजय याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. कॅप्शनमध्ये काजोल म्हणाली, ‘मला माहिती आहे ती किती उत्साही आहेस. मला माहिती आहे आता तू एखाद्या लहाना मुलाप्रमाणे उड्या मारत असशील… टाळ्या वाजवत असशील… तुझ्या केकसाठी धावत असशील… मी तुझ्या दिवसाची सुरुवात तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत करते…’

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘अजय असं काही करतानाचा कोणाकडे व्हिडीओ असेल तर कृपा करु मला सेंड करा…’ असं देखील काजोल पोस्टमध्ये म्हणाली आहे. काजोल हिच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अजय आणि काजोल यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 24 फेब्रुवारी 1999 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर काजोल हिने मुलगी निसा हिला जन्म दिला. त्यानंतर अभिनेत्रीने मुलगा यूग याला जन्म दिला. अजय कायम सोशल मीडियावर मुलगी आणि मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

अजय आणि काजोल गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र आहे. दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. दोघांची जोडी देखील चाहत्यांना प्रचंड आवडते. आज अजय – काजोल त्यांच्या कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगत असून चाहत्यांना देखील कपल गोल्स देत असतात.  सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी काजोल सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.