कंगना राणावत हिने उडवली थेट ‘या’ अभिनेत्रीची खिल्ली, भर मंचावरच अभिनेत्री…
अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावत हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. कंगना सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही कंगना दिसते.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. कंगना आता अभिनयासोबतच राजकारणातही सक्रिय झाल्याचे बघायला मिळतंय. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच कंगना हिच्यासोबत विमानतळावर एक हैराण करणारा प्रकार घडला. ज्यानंतर सर्वजण हैराण झाले. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होताना दिसले. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर कायमच बॉलिवूड कलाकार असतात. नुकताच एका मुलाखतीमध्ये कंगना बॉलिवूड कलाकारांवर टीका करताना दिसली.
कंगना राणावत ही आपल्या इमर्जन्सी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी लाफ्टर शेफमध्ये पोहोचली. यावेळी ती स्पर्धकांसोबत धमाल करताना दिसली. हेच नाही तर स्पर्धकांनी बनवलेले पदार्थ टेस्ट करतानाही कंगना दिसली. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत लाफ्टरमध्ये सहभागी झालीये. विशेष म्हणजे लोकांना अंकिता आणि विकीची जोडी आवडताना देखील दिसत आहे.
अंकिता लोखंडे आणि कंगना राणावत या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांनी एका चित्रपटात काम देखील केले. नुकताच लाफ्टर शेफच्या मंचावर अंकिता लोखंडे हिची खिल्ली उडवताना कंगना दिसली. अंकिता लोखंडे हिला कंगना थेट म्हणाली की, तुला साधा चहा देखील तयार करता येत नाही. कंगनाचे बोलणे ऐकून सर्वजण हसण्यास सुरूवात करतात.
दुसरीकडे कंगना राणावत ही अर्जुन याची डिश टेस्ट करते. यावेळी कंगना म्हणते की, खरोखरच यांची डिश टेस्टी आहे. भर मंचावर अंकिताची खिल्ली उडवताना कंगना दिसल्याने आता त्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. कंगना राणावत ही बिग बॉस मराठी सीजन 5 च्या मंचावर देखील चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचली होती.
आगामी चित्रपटाकडून खूप अपेक्षा कंगना राणावत हिला आहेत. आता कंगनाचा हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे आहे. कंगना राणावत हिने दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाबद्दल एक हैराण करणारे विधान केले होते. तिच्या या विधानानंतर तिच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या समस्या वाढताना देखील दिसत आहेत.