‘लग्नात फुगून बसलेल्या काकांसारखं…’, बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने साधला राहुल गांधींवर निशाणा

| Updated on: Jan 23, 2024 | 12:17 PM

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने साधला निशाणा, थेट लग्नात फुगून बसलेल्या काकांसोबत केली राहुल गांधी यांची तुलना... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

लग्नात फुगून बसलेल्या काकांसारखं..., बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने साधला राहुल गांधींवर निशाणा
Follow us on

Rahul Gandhi : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या कायम राजकारण आणि राजकीय मंडळींबद्दल बोलताना दिसतात. आता बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या ज्या अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री कंगना रनौत आहे. नुकताच, अयोध्या येथे प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा झाली. सोहळ्यासाठी अभिनेत्री उपस्थित होती. येवेळी कंगना हिने विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे जवळपास सर्व नेते प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत पोहोचले होते. पण विरोधी नेते  सोहळ्यासाठी अयोध्येत उपस्थित नव्हते. याबद्दल कंगना हिला विचारण्यात आलं. यावर कंगना हिने दिलेलं लक्षवेधी उत्तर चर्तेत आहे.

हे सुद्धा वाचा

‘प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राहुल गांधी उपस्थित नाहीत, समाजवादी पक्षाचे नेतेही नाहीत…’ असा प्रश्न कंगना हिला विचारण्यात आला. यावर कंगना म्हणाली, ‘त्यांच्या आवाक्यात ही गोष्ट असती तर राम मंदिर कधीच तयार झालं असतं. आपल्यासाठी आता राममय होण्याची वेळ आहे. असं म्हणतात ना… लग्नात त्यांना फुगून बसलेल्या काकांसारखं राहायचं आहे, त्याला आपण काय बोलू शकतो…’ सध्या सर्वत्र कंगना हिची चर्चा रंगली आहे.

 

 

पुढे कंगना म्हणाली, ‘अयोध्य नगरीला एका नवरीप्रमाणे सजवण्यात आलं आहे. प्रत्येक ठिकाणी सध्या भजन आणि पूजा होत आहे.. आपण देवलोकात पोहोचलो आहे… अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे… जी लोकं सध्या याठिकाणी नाहीत, त्यांच्याबद्दल आपण काहीही बोलू शकत नाही… अयोध्या याठिकाणी आल्यामुळे मला चांगलं वाटत आहे…’ सध्या सर्वत्र कंगना रनौत आणि तिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कंगना रनौत हिच्यासोबतच अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. अनुपम खेर, भूषण कुमार, अरुण गोविल, दीपिका चिखलिया, सुनील लहरी, विराट कोहली, अनुष्का शर्मा, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ देखील अयोध्येत उपस्थित होते.