‘मला पुरुषाची गरज नाही…’ म्हणणाऱ्या अभिनेत्रीला आता होतोय पश्चाताप, Egg Freezing केलेत पण….
egg freezing : 'मला पुरुषाची गरज नाही...', आई होणार नसल्याची अभिनेत्रीला सतावतेय भीती, Egg Freezing केल्यामुळे होतोय प्रचंड पश्चाताप... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आणि वैवाहिक आयुष्याची चर्चा...
मुंबई | 17 डिसेंबर 2023 : ‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री मोना सिंग हिने वयाच्या 39 व्या वर्षी लग्न केलं. लग्नाआधी अभिनेत्रीने आई होण्यासाठी अंडी गोठवून (egg freezing) ठेवली. ज्याचा पश्चाताप आता अभिनेत्रीला होत आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने अंडी गोठवून ठेवल्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मोना सिंग हिच्या आयुष्याची चर्चा रंगली आहे.
मुलाखतीत अभिनेत्रीने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. लग्नानंतर अभिनेत्री पतीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. लग्नानंतर नातं टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. ज्यासाठी अभिनेत्री पती श्याम याच्यासोबत वेळ व्यतीत करते. अभिनेत्रीने पतीचा उल्लेख कॉफी पार्टनर, ट्रॅव्हल पार्टनर असा केला..
एवढंच नाही, आम्ही एकमेकांसोबत कायम आमच्या कामाबद्दल देखील बोलतो… असं देखील अभिनेत्री म्हणाली. मुलाखतीत अभिनेत्रीला केलेल्या egg freezing बद्दल देखील विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मला असं वाटायचं मला माझ्या आयुष्यात पुरुषाची गरज नाही… ‘
View this post on Instagram
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘लग्न नव्हतं झालं तरी मला काहीही हरकत नव्हती. पण जेव्हा श्याम माझ्या आयुष्यात आला, तेव्हा मला माझं खरं प्रेम मिळालं. मला कधीच वाटलं नव्हतं की मी कधी लग्न करेल. पण श्याममुळे माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. मी जेव्हा एग्स फ्रिझ केले तेव्हा मी लग्न करेल अशी कल्पना देखील केली नव्हती.’
अभिनेत्रीने लग्नाआधी एग्स फ्रिझ केले पण आता तिला आई होणार नसल्याची भीती सतावत आहे. ‘जर वयाच्या 20 व्या वर्षी लग्न केलं असतं, तर मी आज याठिकाणी नसती. मी आज माझ्या आयुष्यात आनंदी आहे..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
मोना सिंग हिने वयाच्या 39 व्या वर्षी 2019 मध्ये बॉयफ्रेंन्ड श्याम राजगोपालन याच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. मोना कायम तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.