Aamir Khan | एका सीनसाठी अभिनेत्रीने आमिर खानला केलं दिवसभर किस, त्यानंतर जे झालं ते…
'माझी तर लॉटरी लागली...', जेव्हा अभिनेत्रीने सिनेमाच्या एका सीनसाठी अभिनेता आमिर खान याला पूर्ण दिवस केलं किस... अनेक वर्षांनंतर 'तो' किस्सा अखेर समोर

मुंबई | 24 जुलै 2023 : अभिनेता आमिर खान याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आमिरनंतर अनेक अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, पण कोणीही अभिनेत्याची जागा घेवू शकलं नाही. आजही आमिर खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाही तर, आमिर याच्या सिनेमातील अनेक किस्से चाहत्यांसमोर येत असतात. आता देखील अभिनेत्याबद्दल एक मोठी गोष्ट समोर येत आहे. सिनेमातील एका सीनसाठी अभिनेत्याला अभिनेत्रीने दिवसभर किस केलं होतं. सध्या आमिर याच्या ज्या सिनेमाची चर्चा रंगत आहे, त्या सिनेमाचं नाव ‘हम हैं राही प्यार के’ आहे.
चाहते आजही ‘हम हैं राही प्यार के’ सिनेमाला विसरु शकलेले नाहीत. सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. सिनेमात आमिर याच्यासोबत अभिनेत्री जुही चावला मुख्य भूमिकेत होती. ‘हम हैं राही प्यार के’ सिनेमात जुही हिच्यासोबत अभिनेत्री नवनीत निशान देखील मुख्य भूमिकेत होती. (30 years of Hum Hain Rahi Pyar Ke)
नवनीत निशान हिने ‘हम हैं राही प्यार के’ सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात एक विनोदी किस्सा सांगितला आहे. ज्याची सध्या सर्वत्र तुफान चर्चा रंगत आहे. नवनीत निशान म्हणाली, ‘सिनेमात एक किसिंग सीन होता. पण त्यालानंतर हटवण्यात आलं.. म्हणून मला वाईट वाटलं होतं. आमचा साखरपुडा झाला होतो आणि त्यानंतर मी आमिर खान याला घेण्यासाठी त्याच्या घरी जाते…’
पुढे अभिनेत्री म्हणली, ‘आमिर याच्या घरी गेल्यानंतर मी त्याला किस करते. मी त्याला किस केलं तेव्हा त्याच्या गालावर लिपस्टिकची खुण राहते. त्यामुळे आमिर म्हणाला आता हे असं चालू ठेवावं लागेल. आमिरने दिवसभरात 7-8 वेळा मला त्याच्या गालावर किस करायला लावलं. शूट संपल्यानंतर मी घरी आली आणि माझ्या मित्रांना सर्वकाही सांगितलं… माझी तर लॉटरी लागली होती…’ असं देखील नवनीत निशान म्हणाली…
आमिर खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. जुही चावला हिच्यासोबत अभिनेत्याच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आमिर आणि जुही यांनी कयामत से कयामत तक’, ‘लव लव लव’, ‘दौलत की जंग’ आणि ‘इश्क’ यांसारख्या दमदार सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. त्यांच्या सिनेमाची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेली असते.