विमानतळावर बॉलिवूड अभिनेत्रीच्या हॅंडबॅगमध्ये सापडले घरगुती मसाले; सुरक्षा रक्षकांनी काय केलं पाहा

विमानाने प्रवास करताना अनेक गोष्टी घेऊन जाण्यास बंदी असते. त्यात मसाल्यांचाही समावेश होतो. विमान प्रवासाला जात असताना एका बॉलिवूड अभिनेत्रीला हॅंडबॅगमधून मसाले घेऊन जाणे चांगलेच महागात पडले आहे. सुरक्षारक्षकांना जेव्हा अभिनेत्रीच्या बॅगमध्ये मसाले सापडले तेव्हा त्यांनी काय केलं ते पाहा,.

विमानतळावर बॉलिवूड अभिनेत्रीच्या हॅंडबॅगमध्ये सापडले घरगुती मसाले; सुरक्षा रक्षकांनी काय केलं पाहा
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 4:24 PM

विमानाने प्रवास करताना अनेक गोष्टी घेऊन जाण्यास बंदी असते. कोणत्या वस्तू घेऊन जायच्या आणि कोणत्या नाही याबाबत एअर लाईन्सचे नियम फारच काटेकोर असतात. जसं की विमानातून प्रवास करताना नारळ, धारदार वस्तू वैगरे घेऊन जाण्यास मनाई असते. पण असंही म्हटलं जातं की विमानाने प्रवास करताना खाण्याच्या पदार्थांवरही काही प्रमाणात बंधन घातली जातात. म्हणजे त्यांचीही एक लिस्ट असते की कोणते पदार्थ घेऊ जाऊ शकतो आणि कोणते नाही ते.

नीना गुप्ता यांचा अनुभव 

त्यात आता एका अभिनेत्रीला असाच एक अनुभव आला आहे. एका विमानतळावर एका अभिनेत्रीच्या पर्समध्ये घरगुती मसाले सापडले. तेव्हा सुरक्षा रक्षकांमी ते थेट जप्त करण्यात आले. या अभिनेत्रीचे नाव आहे नीना गुप्ता. नीना गुप्ता यांच्यासोबत हा प्रसंग घडला. नीना गुप्ता त्यांचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत हा अनुभव शेअर केला आहे. त्या म्हणाल्या, “मी विमानतळावर होते. मी सहसा माझे जेवण स्वतःच बनवते. त्यामुळे माझ्याजवळ असणाऱ्या हॅण्डबॅगमध्ये घरी बनवलेली धणे पावडर नेहमी असते. पण, विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी ती जप्त केली. मी त्यांच्याकडे ती परतसुद्धा मागितली. तेव्हा कळले की, विमान प्रवासात मसाले घेऊन जाण्यास बंदी आहे. म्हणून हॅण्डबॅगमध्ये मसाले घेऊन जाऊ नका हे मला तुम्हाला सांगावेसे वाटले.” असं म्हणत त्यांनी मसाल्यांच्या बाबतीत विमान प्रवासाचे काय नियम आहेत याबद्दल सांगितले.

विमानातून मसाले घेऊन जाण्यास बंदी का असते?

एव्हिएशन ट्रेनिंग इंडिया, एव्हिएशन तज्ज्ञ राजगोपाल यांच्या मते, नागरी उड्डाण सुरक्षा ब्यूरो (BCAS)ने हॅण्डबॅगमधून मसाल्याच्या पावडर घेऊन जाण्यावर बंदी घातली आहे. याबद्दल डॉक्टर करुणा मल्होत्रा यांनीसुद्धा या संदर्भात सहमती दर्शवली. त्यांनी सांगितले की, विमान प्रवासात धणे पावडर किंवा कोणत्याची मसाल्याची पावडर घेऊन जाण्यास अनेक कारणांमुळे बंदी घालण्यात आली आहे. मसाल्याची पावडर सुरक्षेबाबतची चिंता वाढवू शकते. कारण- असे पदार्थ स्फोटक पदार्थांसारखे असू शकतात.

सुरक्षा कर्मचाऱ्यांना बॅग तपासणीत इतर पावडरपासून मसाले वेगळे करणे आव्हानात्मक वाटू शकतं. त्यामुळे स्क्रीनिंग प्रक्रिया मंद होते. अनेक विमान कंपन्यांचे अधिकारी मसाले घेऊन जाण्याची परवानगी देत नाहीत. त्याव्यतिरिक्त मसाल्यांना तीव्र सुगंध असल्यामुळे बंद विमानात बंदिस्त वातावरणात प्रवाशांना अस्वस्थता जाणवू शकते. केबिनमधील अंतर्गत दाबामुळे ते इतर प्रवाशांच्या अंगावरही पडू शकतात आणि त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असं करुणा यांनी मत व्यक्त केलं आहे.

डॉक्टर करुणा मल्होत्रा पुढे म्हणाल्या की, “मसाल्याच्या उग्र वासामुळे इतर प्रवाशांमध्ये ॲलर्जी किंवा संवेदनशीलता निर्माण होऊ शकते. तसेच तुमच्या शेजारी बसणाऱ्या प्रवाशाला कदाचित मसाले आवडत नसतील किंवा कोणती एलर्जी असेल तर त्या कारणास्तव सामान्यतः हॅण्डबॅगमधून मसाले घेऊन जाण्यावर बंदी घातली जाते. प्रवाशांना सहसा ते मोठ्या सामानांच्या बॅगेत पॅक करण्याचा सल्ला दिला जातो” तसेच मसाला हे शस्त्र म्हणून किंवा इतर प्रवाशांना धमकावण्यासाठीही वापरले जाऊ शकते, असा दावा एव्हिएशन तज्ज्ञ राजगोपाल यांनी केला.

तर एकंदरित नीना गुप्ता यांच्या अनुभवावरून आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यांनुसार एक गोष्ट लक्षात आली असेल की, कोणत्याही प्रकारचे मसाले हॅंडबॅगमधून घेऊन जाता येत नाही. तसेच जर मोठ्या सामानांमधून घेऊन जात असाल तर कोणती काळजी घ्यायची हेही नक्कीच लक्षात आलं असेलचं.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.