वृद्धाची फसवणूक कलेल्यामुळे अभिनेत्रीला अटक, नग्नावस्थेतील फोटो दाखवून लुबाडली मोठी रक्कम

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत मैत्री ७५ वर्षाच्या वृद्धाला पडली महागात; नग्नावस्थेतील फोटो दाखवून पैसे लुबाडल्यामुळे अभिनेत्री अटक

वृद्धाची फसवणूक कलेल्यामुळे अभिनेत्रीला अटक, नग्नावस्थेतील फोटो दाखवून लुबाडली मोठी रक्कम
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 10:33 AM

मुंबई | 29 जुलै 2023 : झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीने एका ७५ वर्षाच्या वृद्धाची फसवणूक करत त्याच्याकडून तब्बल ११ लाख रुपये लुबाडले आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. मल्याळम अभिनेत्री नित्या ससी आणि तिचा मित्र बिनू यांनी मिळून ७५ वर्षाच्या वृद्धाची फसवणूक केली आहे. दोघांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री आणि तिच्या मित्राने वृद्ध व्यक्तीचे न्यूड फोटो दाखवून त्याला बॅकमेल केलं आणि वृद्ध व्यक्तीकडून ११ लाख रुपये उकळले. सध्या याप्रकरणी पोलिसांची पुढील चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

नित्या सासी आणि बिनू (४८) अशी आरोपी आहेत. दोघांनी तिरुअनंतपुरममधील पट्टम येथील ७५ वर्षीय भारतीत सैन्यातील माजी अधिकारी हे केरळ युनिव्हर्सिटीमध्ये काम करत असलेल्या वृद्धाला फसवलं आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नित्याने घर भाड्याने घ्यायचं म्हणून वृद्ध व्यक्तीसोबत संपर्क केला. त्यानंतर ती वृद्ध व्यक्तीच्या घरी गेली आणि दोघांची मैत्री झाली. दाखल केलेल्या तक्रारीनुसार नित्याने वृद्ध व्यक्तीला धमकी दिली आणि त्याला कपडे काढायला लावले. त्यानंतर वृद्ध व्यक्तीचे फोटो न्यूड फोटो काढले.

हे सुद्धा वाचा

वृद्ध व्यक्तीला त्याचं न्यूड फोटो दाखवत त्याला बॅकमेल केलं आणि त्याच्याकडून तब्बल २५ लाख रुपयांची मागणी केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे पैसे नाही दिले तर, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करेल अशी धमकी देखील वृद्ध व्यक्तीला दिली.

मिळत असलेल्या धमक्यांना घाबरुन वृद्ध व्यक्तीने नित्या आणि तिच्या मित्राला ११ लाख रुपये दिले. त्यानंतर दोघे आणखी पैशांची मागणी करु लागले. अखेर ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी वृद्ध व्यक्तीची तक्रार दाखल करत दोघांना अटक केली आहे. सध्या सर्वत्र या धक्कादायक प्रकरणाची चर्चा रंगत आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.