Priya Bapat | आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल जाहीरपणे बोलताना दिसली प्रिया बापट, म्हणाली, आजही खूप आठवण आणि
प्रिया बापट ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे प्रिया बापट ही सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असते. प्रिया बापट हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते. नुकताच प्रिया बापट हिने मोठा खुलासा केला आहे. आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगताना प्रिया दिसत आहे.
मुंबई : प्रिया बापट हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये प्रिया बापट (Priya Bapat) हिने अनेक बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या आहेत. प्रिया बापट हिने फक्त बाॅलिवूडच नाही तर मराठीमध्येही दणदणीत भूमिका चित्रपटात केल्या आहेत. प्रिया बापट हिचा एक मोठा चाहता वर्ग बघालया मिळतो. विशेष म्हणजे प्रिया बापट ही सोशल मीडियावर (Social media) नेहमीच सक्रिय असते. आपला एक वेगळा ठसा उमटवण्यासाठी प्रिया बापट हिला खूप जास्त मेहनत करावी लागलीये. सीटी ऑफ ड्रीम्समुळे प्रिया बापट हिला एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळालीये. काही दिवसांपूर्वी प्रिया बापट हिने घराणेशाहीबद्दल मोठे विधान केले होते.
नुकताच प्रिया बापट हिने मोठे भाष्य करत आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल बोलली आहे. यावेळी प्रिया बापट ही भावूक झाल्याचे देखील बघायला मिळाले. प्रिया बापट ही बालपणापासून दादरच्या चाळीमध्ये राहत होती. याबद्दलच बोलताना प्रिया बापट ही दिसली आहे. इतकेच नाही तर आपले पहिले प्रेम हे चाळच असल्याचे तिने म्हटले आहे.
प्रिया बापट म्हणाली की, मला चाळची खूप जास्त आठवण येते. कारण चाळीमध्ये राहत असताना सणवार साजरे करण्याची काही वेगळी मजा असते. दिवाळीसारखे सण सर्वजण मिळून साजरे करतात. घराला घर चिटकून असल्याने माणसांमध्ये कधीच दुरावा येत नाही. चाळीमध्ये मस्त मैत्रिणींसोबत खेळण्याची मजाच काही वेगळी असते.
पुढे प्रिया बापट म्हणाली, चाळीमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर न पडता तुम्हाला कळते की, शेजाऱ्यांच्या घरी नेमके काय सुरू आहे. एका घरातून दुसऱ्या घरी जाणे देखील चाळीच्या घरात खूप सोपे असते. प्रिया पुढे म्हणाली, या फ्लॅटच्या घरांमध्ये लोक एकमेकांपासून खूप दूर गेले आहेत. लोकांमधील अंतर वाढले आहे.
प्रिया म्हणाली, आज मी नक्कीच आलिशान घरामध्ये राहते. मात्र, माझे पहिले प्रेम हे चाळच आहे. प्रिया बापट हिने मुन्ना भाई एमबीबीएस यासारख्या हिंदी चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका केली आहे. काकस्पर्श या चित्रपटातून खरी ओळख ही प्रिया बापट हिला मिळालीये. विशेष म्हणजे आयुष्यातील 25 वर्षे हे प्रिया बापट हिने चाळीमध्ये काढले आहेत, यामुळे तिचे खास नाते हे चाळीसोबत नक्कीच आहे.