कॅमेऱ्यासमोरच रोमांटिक होताना दिसले प्रियांका चोप्रा आणि निक जोनस, ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल, बाजूला पूल आणि…
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही हॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही भारतात अनंत अंबानी याच्या लग्नासाठी दाखल झाली होती. यावेळी या लग्नात धमाल करताना प्रियांका चोप्रा ही दिसली. निक जोनस हा देखील कायमच चर्चेत असतो.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूड चित्रपटांमध्येही धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हैराण करणारे खुलासे केले. कशाप्रकारे बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्याला काम मिळून नये, म्हणून काही लोक प्रयत्न करताना दिसले. यावेळी एकप्रकारे बॉलिवूडमधील काळे सत्यच सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली. प्रियांका चोप्रा हिच्या या आरोपांनंतर विविध चर्चा या देखील रंगताना दिसल्या. प्रियांका चोप्रा ही निक जोनस याच्यासोबतच्या लग्नानंतर विदेशातच शिफ्ट झालीये. प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.
प्रियांका चोप्रा ही आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या सेटवर आपल्या कुटुंबासोबत खास वेळ घालवताना प्रियांका चोप्रा ही दिसली. विशेष म्हणजे आई मधू चोप्रा, मुलगी मालती मेरी आणि पती निक जोनस हे प्रियांका चोप्रा हिला भेटण्यासाठी चित्रपटाच्या सेटवर पोहोचले होते.
प्रियांका चोप्रा हिचा पती आणि गायक निक जोनस याने एक अत्यंत खास असा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे दोघेही रोमांटिक मूडमध्ये दिसत आहेत. निक जोनस याने शेअर केलेला हा व्हिडीओ त्यांच्या घरामधीलच आहे. दोघेही पूलच्या शेजारी उभे आहेत आणि गाणे सुरू आहे.
View this post on Instagram
यावेळी निक जोनस हा पत्नी प्रियांका चोप्रा हिच्या शेजारी जातो आणि लिपलॉक करतो. त्यानंतर परत त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलताना दिसतात आणि तो प्रियांका चोप्रा हिच्याकडे जातो आणि परत एकदा लिपलॉक करताना दिसतो. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे कॅमेऱ्यासमोरच रोमांन्स करताना दिसत आहेत.
आता प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. अनेकांना प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा हा व्हिडीओ चांगलाच आवडल्याचे दिसत आहे. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. निक जोनस सोशल मीडियावर पत्नी प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालती मेरीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतोय.