शूटिंग सुरू असताना सेटवर अत्यंत मोठा अपघात, अभिनेत्रीचा जळाला चेहरा, अंकिता लोखंडे धावली मदतीला आणि पुढे…
एक अत्यंत हैराण करणारी आणि धक्कादायक घटना घडलीये. या घटनेनंतर सेटवर भीतीचे वातावरण हे बघायला मिळाले. हेच नाही तर या अपघातानंतर चक्क अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मोठ्या जखमा या झाल्या आहेत. अभिनेत्रीने काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहते अभिनेत्रीला काळजी घेण्याच्या सल्ला देताना दिसत आहेत.

‘लाफ्टर शेफ’ हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत दिसत आहे. विशेष म्हणजे हा शो धमाका करतोय. अनेक दिग्गज कलाकार या शोमध्ये सहभागी झाले आहेत. अंकिता लोखंडे, कश्मीरा शाह, अली गोनी, राहूल वैद्य अशी मोठी तगडी टीम या शोमध्ये बघायला मिळते. फुल कॉमेडीचा तडका शोमध्ये आहे. त्यामध्येच भारती सिंह देखील आपल्या कॉमेडीने सर्वांना पोट धरून हसवते. काही दिवसांपूर्वीच सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतरच अंकिता लोखंडे प्रेग्नंट असल्याची चर्चा ही रंगताना दिसली.
आता सध्या सोशल मीडियावर लाफ्टर शेफमधील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसल्याचे देखील बघायला मिळतंय. सेटवर रीम शेख हिच्यासोबत मोठा अपघात झाल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे बघायला मिळतंय. ती ओरडताना दिसत असून सर्वजण तिच्या मदतीला धावताना दिसत आहेत.
या घटनेनंतर रीम शेखच्या चेहऱ्याला मोठी दुखापत झाल्याचे देखील बघायला मिळतंय. कलर्स टीव्हीकडून हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला, जो आता व्हायरल होतोय. लाफ्टर शेफच्या सेटवर स्वयंपाक तयार करताना रीम ही दिसत आहे. त्यावेळी रीमच्या बाजूला भारती सिंह देखील उभी दिसत आहे. भारतीला काहीतरी बोलतानाही रीम दिसत आहे.
View this post on Instagram
अचानक यावेळी रीमच्या चेहऱ्यावर पॅनमधील उडून येते. भारतीला काही कळण्याच्या आतमध्येच रीम ओरडण्यास सुरूवात करते. यावेळी सर्वजण रीमच्या मदतीला धावून आल्याचे देखील बघायला मिळाले. या अपघातानंतर रीमच्या चेहऱ्याला मोठी दुखापत झाल्याचे देखील बघायला मिळतंय. रीमचा चेहरा थोडा जळाला आहे. रीमने काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. त्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर दुखापत झाल्याचे बघायला मिळतंय.
काही जखमा रीमच्या चेहऱ्यावर झाल्या आहेत. रीमने शेअर केलेले फोटो पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे देखील बघायला मिळाले. अनेकांनी रीमसाठी प्रार्थना देखील केलीये. हळूहळू चेहऱ्यावरील डाग जात असल्याचे देखील रीमकडून सांगण्यात आलंय. रीम हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणारे एक नाव आहे.