Richa Chhadha & Ali Fazal: अभिनेत्री ऋचा चड्ढा आणि अली फैजल चढणार बोहल्यावर लग्नाची तारीख उघड, ‘या’ दिवशी दोघे बांधणार लग्नगाठ
ऋचा आणि अली 2020 मध्येच लग्न करणार होते, मात्र कोरोनाच्या संकटामुळे ते कोरोनामुळे लांबले. नुकतेच एका मुलाखतीत याबाबत बोलताना रिचाने सांगितले होते की, आम्ही जेव्हा जेव्हा लग्नाचे प्लॅनिंग केले तेव्हा कोरोनाच्या केसेस सतत वाढत आहे. अभिनेत्रीने सांगितले होते की, यापूर्वी ती 2020 मध्ये लग्न करण्याचा विचार करत होती
बॉलिवूडमध्ये अभिनेता अली फजल (Ali Fazal) आणि अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chhadha)त्यांच्या लग्नाच्याचर्चांना बऱ्याच दिवसापासून उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे स्टार कपल या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, आता त्यांच्या लग्नाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार हे जोडपे पुढच्या महिन्यात लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर वर्षभर एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये (relationship)राहिल्यानंतर आता हे कपल या वर्षी ऑक्टोबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
मुंबईत रिसेप्शनचे आयोजन
वृत्तानुसार, या महिन्यापासून प्री-वेडिंग सुरू होईल. त्याच वेळी, हे जोडपे 6 ऑक्टोबर रोजी लग्न करणार आहेत, तर 7 ऑक्टोबर रोजी मुंबईत रिसेप्शनचे आयोजन केले जाईल. याशिवाय 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन करण्यात येणार आहे. रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की, 4 फॅशन डिझायनर्स लग्नासाठी वेगवेगळ्या फंक्शन्समध्ये परिधान करण्यासाठी रिचाचा ड्रेस डिझाइन करतील.
कोरोनामुळं लांबले लग्न
ऋचा आणि अली 2020 मध्येच लग्न करणार होते, मात्र कोरोनाच्या संकटामुळे ते कोरोनामुळे लांबले. नुकतेच एका मुलाखतीत याबाबत बोलताना रिचाने सांगितले होते की, आम्ही जेव्हा जेव्हा लग्नाचे प्लॅनिंग केले तेव्हा कोरोनाच्या केसेस सतत वाढत आहे. अभिनेत्रीने सांगितले होते की, यापूर्वी ती 2020 मध्ये लग्न करण्याचा विचार करत होती, परंतु कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता तिने आपला प्लॅन रद्द केला. यानंतर 2021 मध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लग्नाचा बेत पुन्हा पुढे ढकलावा लागला होता.