Riya Kumari: अभिनेत्री रिया कुमारीवर पतीनेच झाडली गोळी? CCTV फुटेजमधून महत्त्वपूर्ण माहिती समोर

हायवेवरील अभिनेत्रीच्या हत्येप्रकरणात नवं वळण; पोलीस तपासात पतीबद्दल धक्कादायक माहिती समोर

Riya Kumari: अभिनेत्री रिया कुमारीवर पतीनेच झाडली गोळी? CCTV फुटेजमधून महत्त्वपूर्ण माहिती समोर
अभिनेत्रीची दोन वर्षांच्या मुलीसमोर गोळी झाडून हत्या; कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पतीला अटक Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jan 01, 2023 | 12:22 PM

कोलकाता: झारखंडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिया कुमारी उर्फ ईशा आलियाच्या हत्येप्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. दरोडेखोरांनी रियाला गोळी झाडल्याचं पती प्रकाश कुमारने पोलिसांना सांगितलं. मात्र नंतर रियाच्या आईवडिलांच्या तक्रारीनंतर पती आणि दीर संदीप यांना हत्येप्रकरणात अटक झाली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं आहे. मात्र हा फुटेज पाहिल्यानंतर घटनेला नवं वळण मिळालं आहे.

कशी झाली रियाची हत्या?

30 वर्षीय रिया ही पती आणि दोन वर्षीय मुलीसोबत झारखंडहून कोलकाताला जात होती. पहाटे 6 वाजता काही दरोडेखोरांनी रियाची गाडी हायवेवर थांबवली. दरोडेखोरांनी पतीला लुटण्याचा प्रयत्न केला असता त्याला वाचवण्यासाठी रिया गाडीतून उतरली आणि त्यावेळी दरोडेखोरांनी तिच्यावर गोळी झाडली. रियाच्या कानाजवळ त्यांनी पॉईंट ब्लँक रेंजने गोळी झाडली आणि त्यांनी तिथून पळ काढला, अशी माहिती तिच्या पतीने पोलिसांना दिली.

पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दरोडेखोरीची कोणतीही घटना झाल्याचे संकेत मिळाले नाहीत, अशी माहिती समोर येतेय. त्यामुळे पतीनेच रियाच्या हत्येसाठी सापळा रचला आणि पोलिसांना खोटी कहाणी सांगितली, असा संशय व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

पती आणि दीराने घेतलं होतं शूटिंगचं प्रशिक्षण

रियाच्या पतीवरील संशय दाट होत असतानाच आता सासरे धनेश्वर राम यांनी पोलीस चौकशीदरम्यान महत्त्वपूर्ण माहिती सांगितली. रियाचा पती प्रकाश कुमार आणि दीर संदीप कुमार यांनी शूटिंगचं प्रशिक्षण घेतलं होतं, असं ते म्हणाले. “माझ्या तिन्ही मुलांनी शूटिंगचं प्रशिक्षण घेतलंय. मात्र प्रकाश नंतर चित्रपट निर्मितीकडे वळला. संदीप अजूनही शूटिंगचं प्रशिक्षण घेतोय. माझा तिसरा मुलगा आकाश कुमार हा भारतीय सैन्यात अधिकारी आहे”, अशी माहिती त्यांनी पोलिसांना सांगितली.

रांची इथल्या प्रकाशच्या घरी परवानाकृत बंदुक असल्याचंही धनेश्वर यांनी पोलीस चौकशीदरम्यान सांगितलं. सध्या पोलीस रियाला ज्या बंदुकीने गोळी झाडली, त्याचा शोध घेत आहेत. प्रकाश आणि संदीप या दोघांव्यतिरिक्त प्रकाशची पहिली पत्नी सरबा देवी हिचंही एफआयआरमध्ये नाव आहे. याप्रकरणी तिचाही काही सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

रियाच्या कुटुंबीयांचा प्रकाशवर आरोप

प्रकाशनेच रियाच्या हत्येची सुपारी दिली असा आरोप करत तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रकाश रियाचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. रिया त्याच्यापेक्षा अधिक लोकप्रिय होत असल्याने आणि अधिक पैसा कमवत असल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाले, असं कुटुंबीयांनी म्हटलंय.

कोण होती रिया कुमारी?

रिया ही झारखंडमधील अभिनेत्री आणि युट्यूबर आहे. सोशल मीडियावर ती इशा आयला या नावाने प्रसिद्ध आहे. तिचा पती प्रकाश हा चित्रपट निर्माता आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.