‘माझ्या वाढलेल्या शरीराबाबत कमेंट्स करत…’, ट्रोलिंगमुळे सई लोकूर अखेर संतापलीच, पोस्ट व्हायरल
Sai Lokur | गरोदरपणात वाढलेल्या वजनामुळे अभिनेत्री ट्रोल, संतापात म्हणाली, 'माझ्या वाढलेल्या शरीराबाबत कमेंट्स करत...', सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा... ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने चांगलंच सुनावलं...
‘मराठी बिग बॉस’ फेम अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. सई विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. पण आता सई हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. सध्या सर्वत्र सई हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, लग्नाच्या ३ वर्षांनंतर सईने डिसेंबर २०२३ मध्ये एका गोड मुलीला जन्म दिला. गरोदरपणात अभिनेत्रीचं वजन वाढलं. वाढलेल्या वजनावरुन सतत अभिनेत्रीला ट्रोल करण्यात येत आहे.
अशात सोशल मीडियावर संताप व्यक्त करत सई म्हणाली, ‘लोकांना जाड आणि बारीक या पलीकडे काहीच दिसत नाही की?’ असा प्रश्न उपस्थित करत अभिनेत्री म्हणाली, ‘गरोदरपणानंतर महिलांना जवळपास 6 महिने रजा मिळते. पण मी गरोदरपणानंतर तीन महिन्यात काम सुरु केलं आहे.’
‘महिला 6 महिने बाळाचं संगोपन करतात, पण मी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. जाहिरातींचा प्रचार, जाहिरांतीसाठी मी शुटिंग करत आहे. एका नव्या आईला तिच्या कामासाठी प्रोत्साहन देण्याएवजी माझ्या वाढलेल्या शरीरावर तुम्ही कमेंट करत मला ट्रोल करत आहात… हे किती लाजिरवाणं आहे… कोणत्या समाजात आपण राहत आहोत?’ असा प्रश्न देखील अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना विचारला.
सई लोकूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चहात्यांचं मनोरंजन केलं. रुपेरी पडद्यावर सक्रिय असताना अभिनेत्रीने 2020 मध्ये तीर्थदीप रॉयसह लग्न केलं. सईच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. लग्नाच्या तीन वर्षांनंतर अभिनेत्रीने मुलील जन्म दिला.
बिग बॉसमुळे देखील अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी सई लोकूर 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी सिनेमात देखील झळकली होती. या सिनेमात कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील होता. यात सईने कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारली होती.