‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीला गंभीर आजाराची लागण, शस्त्रक्रियेच्या अगोदर अभिनेत्रीने व्हिडीओमध्ये केला खुलासा, म्हणाली..
बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टी ही नेहमीच चर्चेत असते. शमिता शेट्टी सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील कायमच दिसते. शमिता शेट्टी हिने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. आता शमिता शेट्टीचा व्हिडीओ पाहून लोक हैराण झालेत.
बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टी ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच शमिता शेट्टी ही बिग बाॅसच्या घरात धमाका करताना दिसली. शमिता शेट्टी ही सोशल मीडियावर सक्रिय देखील असते. शमिता शेट्टी हिने बाॅलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. मात्र, म्हणावे तसे यश शमिता शेट्टीला बाॅलिवूडमध्ये मिळाले नाही. अनेक स्टारसोबत शमिता शेट्टीचे नाव जोडले गेले. मात्र, शमिता शेट्टी ही अजूनही सिंगलच आहे. शमिता शेट्टी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना शमिता शेट्टी ही दिसते.
शमिता शेट्टी हिने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हैराण करणारे म्हणजे शमिता शेट्टी हिने हा व्हिडीओ थेट रूग्णालयातील बेडवरून तयार केला आहे. शमिता शेट्टी हिला गंभीर आजाराची लागण झालीये, हेच नाही तर शमिता शेट्टी हिच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आलीये. शमिता शेट्टी हिने हा व्हिडीओ शस्त्रक्रियेला जाण्याच्या अगोदर तयार केलाय.
शमिता शेट्टी हिला एंडोमेट्रिओसिसचा आजार झालाय. व्हिडीओमध्ये शमिता शेट्टी ही म्हणाली की, सर्व महिलांनी कृपया एंडोमेट्रिओसिस गुगल करा. आपल्याला समस्या काय आहे हे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. कदाचित तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल. पाॅझिटिव्ह राहायचे देखील म्हणताना शमिता शेट्टी या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. शमिताचा हा व्हिडीओ शिल्पा शेट्टी हिने काढलाय.
View this post on Instagram
हा व्हिडीओ शेअर करत खास कॅप्शन देखील शेअर करण्यात आलंय. तुम्हाला माहित आहे का की सुमारे 40 टक्के महिलांना एंडोमेट्रिओसिस आहे आणि आपल्यापैकी बहुतेकांना या आजाराची माहिती नाही. माझे दोन्ही डॉक्टर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीता वर्टी आणि जीपी डॉ. यांचे आभार मानते, असेही त्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.
या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी ही शमिता शेट्टी हिला प्रश्न विचारताना दिसत आहे. मात्र, व्हिडीओमध्ये फक्त शमिता शेट्टी हिच दिसत आहे. शिल्पा शेट्टी दिसत नसून तिचा आवाजच ऐकून येत आहे. या व्हिडीओसोबत शमिता शेट्टी ही एंडोमेट्रिओसिस आजाराबद्दल महिलांना माहिती सांगताना देखील दिसत आहे. आता शमिता शेट्टीच्या व्हिडीओवर कमेंट करत चाहते हे तिला काळजी घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.