प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रेमात फसवणूक; निर्मात्याने लीक केला MMS, तक्रार दाखल
अभिनेत्रीचा एमएमएस व्हिडीओ लीक होण्याच्या घटना याआधीही अनेकदा घडल्या आहेत. भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या MMS व्हिडीओ लीकप्रकरणी चर्चेत आली होती. सोशल मीडियावर एक एमएमएस क्लिप व्हायरल झाली होती आणि त्यात भोजपुरी क्वीन अक्षरा सिंह असल्याचं नेटकरी म्हणत होते.
ओडिसा | 3 ऑगस्ट 2023 : ओडिसा चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शीतल पात्राने प्रसिद्ध चित्रपट निर्माते दयानिधी दाहिमा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दयानिधी यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी तिचे खासगी फोटो आणि एमएमएस लीक केल्याचा गंभीर आरोपही शीतलने केला आहे. शीतल आणि दयानिधी यांचं याआधीही एकमेकांशी नाव जोडलं गेलं होतं. एकेकाळी हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र जेव्हा ब्रेकअप झालं तेव्हा दयानिधी यांनी तिचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक केला, असं शीतलने म्हटलंय. याप्रकरणी तिने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा दाखल केली आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितलं की ती निर्माते दयानिधी दाहिमा यांना काही काळ डेट करत होती. मात्र या नात्यात त्यांनी तिला फसवलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं, असा आरोप शीतलने केला आहे. या नात्यात सुरुवातीच्या काळात सर्वकाही ठीक होतं. मात्र शीतलने जसं दुसऱ्या निर्मात्यांसोबत काम करणं सुरू केलं, तेव्हा दयानिधी यांना गोष्टी खटकू लागल्या.
या वर्षाच्या मार्च महिन्यात शीतलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत दयानिधीबद्दल खुलासा केला होता. “खोट्या बातम्या पसवरणं आणि सायबर बुलींग हा अपराध आहे. दयानिधी दाहिमा नावाची व्यक्ती सोशल मीडियावर अशी एक एजन्सी चालवते. त्याने बरेच फेक अकाऊंट सुरू केले आहेत आणि आता कुठे त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे”, असं तिने या व्हिडीओत म्हटलं होतं.
“काही लोकांसाठी ही केवळ एक मस्करी असू शकते. मात्र लोकांनी हे समजलं पाहिजे की त्यामुळे एखाद्या मुलीचं किंवा महिलेचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. मी सर्व कलाकारांना आणि विशेषकरून महिलांना सांगू इच्छिते की ते कामानिमित्त ज्या लोकांना भेटतील, त्यांच्याबद्दल त्यांनी जागरूक राहावं”, असंही ती म्हणाली.
अभिनेत्रीचा एमएमएस व्हिडीओ लीक होण्याच्या घटना याआधीही अनेकदा घडल्या आहेत. भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या MMS व्हिडीओ लीकप्रकरणी चर्चेत आली होती. सोशल मीडियावर एक एमएमएस क्लिप व्हायरल झाली होती आणि त्यात भोजपुरी क्वीन अक्षरा सिंह असल्याचं नेटकरी म्हणत होते.