श्रिया सरनने सोशल मीडियावर शेअर केला गुलाबी बिकिनीतील बोल्ड फोटो, ‘कमबॅक’च्या चर्चांना उधाण!

गुलाबी रंगातल्या बिकिनीतील स्वत:चा ग्लॅमरस फोटो श्रियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या बोल्ड लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या आयुष्यातील नवी अपडेट आणि नवा अवतार पाहून चाहते देखील खुश झाले आहेत.

श्रिया सरनने सोशल मीडियावर शेअर केला गुलाबी बिकिनीतील बोल्ड फोटो, ‘कमबॅक’च्या चर्चांना उधाण!
श्रिया सरन
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 3:56 PM

मुंबई : अभिनेत्री श्रिया सरनची साऊथ इंडस्ट्रीमध्ये जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. अभिनेत्री श्रिया सरन (Shriya Saran), अजय देवगणच्या ‘दृश्यम’ या चित्रपटात दिसली होती. अभिनयाच्या बाबतीत तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. श्रिया गेल्या काही वर्षांपासून स्पेनमध्ये राहत होती. तीन वर्षे स्पेनमध्ये घालवल्यानंतर श्रिया सरनने नुकताच एक बोल्ड फोटो शेअर करत आपल्या ‘कमबॅक’ची हिंट दिली आहे (Actress Shriya Saran share hot pink bikini photo on social media).

गुलाबी रंगातल्या बिकिनीतील स्वत:चा ग्लॅमरस फोटो श्रियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या बोल्ड लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या आयुष्यातील नवी अपडेट आणि नवा अवतार पाहून चाहते देखील खुश झाले आहेत.

श्रियाचे बिकिनी फोटोशूट

श्रियाने नुकतेच एक बिकिनी फोटोशूट केले आहे. यासाठी तिने बिकिनीसोबत एक गोल्डन शीर टॉप परिधान केला आहे आणि कॅमेर्‍यासमोर हटके फोटो पोज देताना दिसत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली श्रिया सरन आता मुंबईला परतली आहे. श्रियाने तिचा रशियन बॉयफ्रेंड आंद्रे कोचीएव्हसोबत राजस्थानमध्ये लग्न केले होते. त्यानंतर दोघेही स्पेनमध्ये स्थायिक झाले होते. नुकतीच श्रिया आपल्या पतीसह मुंबईला आली आहे. अभिनेत्री चित्रपटात कमबॅक करण्यासाठी सज्ज असल्याचा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. फोटो शेअर करताना श्रियाने लिहिले की, “आंद्रे, चला समुद्र किनाऱ्यावर जाऊया, आरामदायक, हलकी आणि सुटसुटीत कपडे घालूया..”

पाहा श्रियाचे फोटोशूट

 (Actress Shriya Saran share hot pink bikini photo on social media)

आंद्रेचा श्रियाला पाठींबा

श्रिया सरन यांनी बॉक्स पॅक करताना काही फोटो शेअर केले होते, ज्यात तिने सांगितले होते की, ती आता भारतात परतत आहे. या साथीच्या आजाराच्या काळात तिने आपले घर खूपच मिस केले आहे. अभिनेत्री श्रिया तिचे वैयक्तिक जीवन नेहमीच खाजगी ठेवते. वैयक्तिक आयुष्यासंदर्भात ती चाहत्यांसह जास्त शेअर करत नाही. श्रियाने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, आंद्रेने तिच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन केले आहे. आमच्या लव्ह लाइफबद्दल काहीही लपलेले नाही. मला फक्त आयुष्य थोडे सोपे ठेवणे आवडते. माझे कामच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला काम करताना पाहून माझे पती खूप खूश होतो आणि तो नेहमीच मला पाठींबा देतो.

बॉलिवूड लाईफनुसार, श्रिया सरन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘देवाने मला सर्व काही दिले आहे, विशेषत: आंद्रेच्या रूपात एक समर्थक जोडीदार. मला पतीपेक्षा पार्टनर हा शब्द जास्त आवडतो. कारण आंद्रे हा पार्टनर-इन-क्राईम, पार्टनर-इन-फन आणि सर्व आहे. तो माझ्या कामाचे नेहमी कौतुक करतो आणि माझे समर्थन करतो.’ श्रिया सरन हिनी लग्नानंतर प्रवासात बराच वेळ घालवला आहे. हे जोडपे पेरू आणि कोलंबियामध्ये फिरताना दिसले होते. जर, आता श्रियाने चित्रपटात पुनरागमन करण्याची योजना आखली असेल, तर ती चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असू शकते.

(Actress Shriya Saran share hot pink bikini photo on social media)

हेही वाचा :

Shreya Ghoshal | श्रेया घोषालच्या बाळाचं नामकरण, त्रिकोणी कुटुंबाचा पहिला फोटोही शेअर

Video | 5Gच्या दुष्परिणामांवर जुही चावलाने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली ‘फोन जादूवर काम करत नाहीत पण…’

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.