लग्नाची खूप भिती वाटते या अभिनेत्रीला; ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कधीच करणार नाही लग्न, नक्की कारण काय?

प्रसिद्ध बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्रीने लग्नाबद्दल आपला स्पष्ट निर्णय जाहीर केला आहे. ती कधीही लग्न करणार नसल्याचं अभिनेत्रीने जाहीर केलं आहे. अभिनेत्रीच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

लग्नाची खूप भिती वाटते या अभिनेत्रीला; ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कधीच करणार नाही लग्न, नक्की कारण काय?
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 4:56 PM

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या अभिनेत्रींनी लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. तर अनेक अभिनेत्री आई देखील झाल्या आहेत. तसेच बॉलिवूडमध्ये अफेअर्स, लिव्ह इन, ब्रेकअप यासर्व गोष्टींची चर्चा कायमच होत राहते. तसेच अनेक अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्याही बातम्या आहेत. पण अशी एक अभिनेत्री अशी आहे जिला कधीही लग्न करायचं नाहीये.

कधीही लग्न करण्याचा निर्णय 

बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रीने एक तिच्या लग्नाबद्दलचे विचार आणि तिची इच्छा व्यक्त केल्यावर सर्वजण शॉक झाले आहे. कारण या अभिनेत्रीने ती कधीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ती अभिनेत्री म्हणजे श्रुत हासन.

श्रुती हासन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तशी नेहमीच चर्चेत असते. पण ती सध्या तिच्या लग्नाच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. श्रुतीला प्रेम, रोमांस किंवा अगदी लिव्ह इन मध्ये राहायलाही आवडतं. पण तिला लग्न आवडत नाही. ती बरीच वर्ष एका रिलेशनशिपमध्ये होती. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्येही राहायची. पण तिने लग्न करण्यास साफ नकार दिला आहे.

लग्न आणि अटॅचमेंटची भिती

एका मुलाखतीत श्रुतीला ती अजूनही लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम आहे का? याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ती म्हणाली,” मला नाती आवडतात. प्रेम, रोमांस, लिव्ह इनमध्ये राहायलाही आवडतं. पण मला लग्न आणि अटॅचमेंटची भिती वाटते. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, श्रुती लग्नाबाबत कोणत्याही भूतकाळातील अनुभवांना प्राधान्य देत नाही. तिचे असे अनेक मित्र आहेत जे यशस्वी विवाहित आहेत.

तसेच अभिनेत्री कोणावर कधीच प्रेम करणार नाही असं नाही. ती आवडणाऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहण्यासही तयार आहे. पण लग्नासाठी वचनबद्ध होणार नाही असं तिने स्पष्टच सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वीच एक्स बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप

दरम्यान काही काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचे तिचा एक्स बॉयफ्रेंड शंतनू हजारिकासोबतचे नाते तुटले. दोघेही 3 ते 4 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आणि तेव्हाही ती लग्न करण्याच्या मुद्द्यावर ठामच होती.

श्रुतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती थलैवा रजनीकांत यांच्यासोबत ‘कुली’ या चित्रपटात दिसणार आहे. याचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे. तसेच अभिनेत्रीचा ‘सालार 2’ देखील सध्या चर्चेत आहे. श्रुतीने हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.