Video | ‘माझ्या गालावर पडते खळी, नाक माझं बाई चाफेकळी…’, श्रुती मराठेच्या अदा पाहून नेटकरी फिदा!

मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘राधा’ अर्थात अभिनेत्री श्रुती मराठे (Actress Shruti Marathe) ही मनोरंजन विश्वाबरोबरच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असलेली ही मराठमोळी अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करतेय.

Video | ‘माझ्या गालावर पडते खळी, नाक माझं बाई चाफेकळी…’, श्रुती मराठेच्या अदा पाहून नेटकरी फिदा!
श्रुती मराठे
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 11:26 AM

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘राधा’ अर्थात अभिनेत्री श्रुती मराठे (Actress Shruti Marathe) ही मनोरंजन विश्वाबरोबरच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असलेली ही मराठमोळी अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करतेय. तिच्या या व्हिडीओ आणि फोटोंना प्रचंड लाईक्स आणि कमेंट मिळत आहेत. नुकताच श्रुतीने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना घायाळ केलं आहे (Actress Shruti Marathe share cuteness overloaded video on social media).

या व्हिडीओ श्रुती ‘मला म्हणत्यात हो, म्हणत्यात पुण्याची मैना’ या गाण्यावर आपल्या अदा दाखवल्या आहेत. श्रुतीचा हा व्हिडीओ पाहून चाहते घायाळ झाले आहेत. ‘माझ्या गालावर पडते खळी, नाक माझं बाई चाफेकळी…’, असे बोल असणाऱ्या या गाण्यावर श्रुतीने व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. गाण्याप्रमाणेच श्रुतीच्या गालावर देखील खळी पडत असल्याने, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पाहा श्रुतीचा व्हिडीओ

पुण्याचीच ‘मैना’

अभिनेत्री श्रुती मराठेचा जन्म बडोद्याचा. मात्र, त्यानंतर तिचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. पुण्याच्याच शाळेत श्रुतीचं शिक्षण झालं. शाळेत असल्यापासूनच श्रुतीला अभिनय आणि खेळाची प्रचंड आवड होती. दहावीत असताना तिला पहिल्यांदाच अभिनय करण्याची संधी मिळाली. ‘पेशवाई’ या मालिकेतून तिने अभिनय विश्वात पदार्पण केले होते. पुढे महाविद्यालयीन जीवनात तिने शिकत असतानाच, नाटकातून काम करायचे ठरवले (Actress Shruti Marathe share cuteness overloaded video on social media).

साऊथमधून पदार्पण

अभिनयाच्या वेडापायी श्रुतीने मुंबई गाठली. यानंतर तिला पहिल्यांदा तामिळ चित्रपटात संधी मिळाली. या चित्रपटात तिच्या अभिनायचे खूप कौतुक झाले. मनोरंजन विश्वात पदार्पण करताना श्रुतीने आपलं नाव ‘हेमामालिनी’ असं केलं होतं. मात्र, नंतर तिने आपलं नाव श्रुती प्रकाश असं केलं. दक्षिणात्य मनोरंजन विश्वात आजही श्रुती ‘श्रुती प्रकाश’ या नावानेच ओळखली जाते.

मराठीत पदार्पण

श्रुती मराठेने ‘सनई-चौघडे’ या चित्रपटातून मराठीत पदार्पण केले. तिची या चित्रपटातील छोटीशी भूमिका देखील चाहत्यांच्या लक्षात राहिली. यानंतर श्रुती अनेक मराठी चित्रपटात झळकू लागली. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘राधा ही बावरी’ या मधून तिला खरी ओळख मिळाली.

(Actress Shruti Marathe share cuteness overloaded video on social media)

हेही वाचा :

Indian Idol 12 | पॉवर प्लेमध्ये सगळ्यात कमी मतं, मराठमोळी अंजली गायकवाड ‘इंडियन आयडॉल 12’मधून बाहेर!

Khoya Khoya Chand : ‘जुम्मा चुम्मा’ गाण्यावरअमिताभसोबत धमाल, आता कुठे आहे किमी?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.